Latest

‘ही’ महिला करणार ‘एआय’शी लग्न!

Arun Patil

माद्रिद : काही लोकांचा आहार जसा विचित्र असतो तशी काही लग्नेही विचित्र असतात. या दोन्ही गोष्टी काही विशिष्ट अशा विकारांमुळे घडतात, असेही समोर आलेले आहे. कुणी चक्क इमारतीशी विवाह करतो, तर कुणाला एखाद्या वस्तूबद्दल प्रेम वाटू लागतं. सध्याचा जमाना 'एआय' म्हणजेच 'आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी'चा आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेने तसेच होलोग्रामने काही आभासी व्यक्तीही बनवल्या जाऊ शकतात. आता एका महिलेने अशाच 'एआय'ने बनवलेल्या आभासी व्यक्तीशी लग्न करण्याचे ठरवले आहे.

स्पॅनिश कलाकार एलिसिया फ्रेमिसने हा निर्णय घेऊन जगाला धक्का दिला आहे. तिने आपल्या एआय होलोग्राफिक पार्टनरसोबत लग्नाची घोषणा केली आहे. साध्या भाषेत समजून घ्यायचं, तर एखादा मानव आणि तंत्रज्ञानामध्ये होणारे हे पहिलेच लग्न आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये एलिसिया फ्रेमिस आपल्या एआय होलोग्राफिक पार्टनरसोबत बसलेली दिसत आहे. ती आपल्या या लाडक्या पार्टनरसोबत बोलत असते, जेवत असते आणि खूप सार्‍या गप्पा मारताना आणि त्याच्यावर प्रेम करताना दिसते. स्पॅनिश कलाकार एलिसिया फ्रेमिस आणि एआय होलोग्राफिकचे लग्न रॉटरडॅममध्ये होणार्‍या एका सोहळ्यात होईल.

मानवी आणि तंत्रज्ञानाच्या नात्याचे हे मिश्रण असेल. या जोडप्याला 'हायब्रीड कपल' नावाने ओळखले जाईल. समोर आलेल्या वृत्तानुसार, स्पॅनिश कलाकार एलिसियाने आपला एआय पार्टनर तिच्या आधीच्या रिलेशनशिप्समधील डेटाच्या आधारे तयार केला आहे. तिने आपल्या या आयुष्यभराच्या जोडीदाराला 'एआयलेक्स' (किंवा अ‍ॅलेक्स) असे नाव दिले आहे. या व्हिडीओवर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक तिच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत, तर अनेक जण तिची खिल्ली उडवत तिला ट्रोलदेखील करत आहेत. या पोस्टला आतापर्यंत 19 हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT