पुढारी ऑनलाईन – पालघर येथील २०२०च्या साधूंच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा तपास राज्य पोलिसांमार्फत होईल, अशी भूमिका सरकारने घेतली होती. (Palghar lynching probe to CBI)
१६ एप्रिल २०२०मध्ये पालघरमध्ये चिकने महाराज कल्पवृक्षगिरी, सुशील गिरी महाराज आणि या दोन साधूंच्या वाहनाचा चालक निलेश तेलगाडे यांची जमावाने ठेचून हत्या केली होती. ही घटना डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात घडली होती. हे साधू सुरूतमध्ये एका साधू महाराजांच्या अंत्यविधीसाठी चालले होते. मुलांचे अपहरण करणारे असे समजून जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. या मारहाणीत हस्तक्षेप करणाऱ्या पोलिसांनाही जमावाने मारहाण केली होती.
या प्रकरणात श्री पंच दशनम जुना आखाडा आणि मृत साधूंच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एनआयएकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा :