पुढारी ऑनलाईन डेस्क – RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा व्याजदर वाढवणार का, याकडे आता देशाचे लक्ष लागलेले आहे. आज ८ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार आहे. २५ बेसिक पॉईंटने व्याजदर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय एमपीसीचा निर्णय बुधवारी सकाळी १० वाजता जाहीर केला जाईल. तज्ञांचा असा विश्वास आहे की MPC रेपो दर (– RBI ज्या दराने बँकांना कर्ज देते — ) 25 bps ने बुधवारी 6.50 टक्क्यांनी वाढवू शकते.
RBI : महागाईचा दर गेल्या काही दिवसांत कमी आलेला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरणात व्याजदरात २५ बेसिक पॉइंट किंवा ०.२५ टक्के इतकी वाढ करू शकेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी ५ वेळा व्याजदरात मोठी वाढ केलेली आहे.
RBI : गेल्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात सातत्याने वाढ केलेली आहे. गेल्या वर्षांतील ५ वेळाची वाढ लक्षात घेतली तर एकूण वाढ २.२५ टक्के किंवा २२५ बेसिक पॉईंटची आहे. रेपो दरात वाढ झाल्याने कर्जांवरील व्याज आणि जोडीनेच ठेवींवरील व्याजही वाढलेले आहेत. रिझर्व्ह बँकने रेपो दरात वाढ केली तर कर्ज आणखी महाग होणार आहेत.
हे ही वाचा :