WI vs IND 2nd T20 
Latest

WI vs IND 2nd T20 : भारताचे वेस्टइंडिज समोर १५३ धावांचे आव्हान

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध वेस्टइंडिज टी२० मालिकेतील दुसरा सामना आज (दि.६) प्रोविडंस स्टेडियम, गोयाना येथे खेळवला जात आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर १५२ धावा केल्या असून वेस्टइंडिज समोर १५३ धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारताकडून, तिलक वर्माने ४१ चेंडूमध्ये ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताला १५० धावांचा टप्पा गाठता आला. शिवाय, भारताकडून इशान किशन २३ चेंडूमध्ये २७ धावा, हार्दिक पंड्याने १८ चेंडूमध्ये २४ धावा आणि अक्षर पटेलने १२ चेंडूमध्ये १४ धावांचे योगदान दिले. वेस्टइंडिजकडून जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड आणि अकेल होसेनने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.

India Playing XI : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, रवी बिश्नोई (WI vs IND 2nd T20)

India Playing XI : ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय (WI vs IND 2nd T20)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT