Latest

फ्रीजमध्ये वरच्या बाजूलाच का असतो फ्रीजर?

Arun Patil

नवी दिल्ली : बर्‍याच वेळा आपण नेहमी वापरत असलेल्या वस्तूंचीही आपल्याला पुरेशी माहिती नसते. रेफ्रिजरेटर हे किचनमधील सर्वात महत्त्वाच्या अप्लायन्सपैकी एक आहे. उन्हाळ्यात अन्नपदार्थ खराब होण्यापासून रोखण्यासाठी आणि पदार्थ थंड करण्यासाठी याचा वापर केला जातो. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरात फ्रीज दिसतील. गरजेनुसार कंपन्या वेगवेगळ्या क्षमतेचे फ्रीज तयार करतात. घरात वापरल्या जाणार्‍या बहुतेक रेफ्रिजरेटरमध्ये फ्रीजरवरती असल्याचे तुम्ही पाहिले असेलच; पण असे का होते याचा कधी विचार केला आहे का? फ्रीजर फ्रीजच्या तळाशी का ठेवले जात नाही? (काही लोकांना वाटते की फ्रीजर वर ठेवले आहे, जेणेकरून लहान मुले त्यात ठेवलेली आईस्क्रीम बाहेर काढून खाऊ शकणार नाहीत!) यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. फ्रीजमध्ये फ्रीजर वरच्या दिशेने का दिले जाते ते जाणून घेऊया.

सर्वात आधी, आपण जाणून घेऊया की, गरम हवा हलकी असते आणि थंड हवा जड असते. फ्रीजमधील फ्रीझर कंपार्टमेंटचे तापमान सर्वात कमी राहते. त्यामुळे आजूबाजूची हवाही थंड राहते. आता थंड हवा जड असते. म्हणूनच ती खाली येते आणि खालील गरम हवा किंवा वरीलपेक्षा किंचित जास्त तापमान असलेली हलकी हवा वर जाते. ही गरम हवा वर जाते आणि फ्रीझरवर आदळते आणि पुन्हा थंड होते. जेव्हा ती थंड होते, तेव्हा ती पुन्हा खाली येते आणि खाली असलेली गरम हवा रिप्लेस करून पुन्हा वर पाठवते. अशाप्रकारे हे चक्र चालू राहते आणि संपूर्ण फ्रीजमध्ये तापमान योग्य राहते.

फ्रीझर खाली ठेवल्यास, जड असलेली थंड हवा तळाशी राहील आणि वरची उबदार हवा वरच्या बाजूला राहील. या कॉम्बिनेशनमध्ये फ्रीजमध्ये योग्य कूलिंग होत नाही. फ्रीजरवरती ठेवण्याचा एक फायदा म्हणजे फ्रीज बंद केल्यावर, फ्रीजरला टक्कर देऊन हवेचे थंड होऊन खाली येण्याची सायकल चालत राहते. ज्यामुळे फ्रीजमध्ये प्रॉपर कूलिंग बॅलेन्स राहते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT