‘गजोधर भैया’ची एक्झिट 
Latest

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांकडून पुन्हा शुद्धीवर आल्याचा दावा का केला जातोय?

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरातील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, यांना हृदयविकाराच्या झटक्याने गेल्या एक महिन्यापासून दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. राजू श्रीवास्तव हे ३१ व्या दिवशी म्हणजेच १० सप्टेंबरलाही शुद्धीवर आले नाहीत. गेल्या १५-२० दिवसांत राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याचे कुटुंबीयांकडून वारंवार सांगण्यात आले, परंतु एम्सच्या डॉक्टरांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.

त्यांचे कुटुंबीय म्हणाले, राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले आहेत

विशेष म्हणजे महिनाभरानंतरही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. यांच्या कुटुंबीयांच्या वतीने मीडियामध्ये अनेकदा सांगण्यात आले आहे कि, त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या हात-पायांमध्येही हालचाली सुरु आहेत.

नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू आहेत

दुसरीकडे, एम्सच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हात-पायांची हालचाल आणि काही काळ डोळे उघडणे म्हणजे शुद्धीत आहे असे म्हणता येणार नाही. एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांची बेशुद्धी हा डॉक्टर तसेच कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे, देशातील प्रसिद्ध डॉक्टर नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी 2 ते गुरुवारी सकाळी 8 च्या दरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या डोळ्यात थोडीशी हालचाल झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. दुसरीकडे, डॉक्टरांचे म्हणणे आहे की याला पुन्हा चैतन्य येणे असे म्हणतात.

मेंदू नीट काम करत नाही

एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी राजूला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही, जी कि प्रसारमाध्यमांना सांगावी. हृदयविकाराचा झटका आल्यापासून त्याचा मेंदू नीट काम करत नसल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले, जोपर्यंत राजू श्रीवास्तवच्या मेंदूमध्ये कोणतीही हालचाल होत नाही तोपर्यंत राजूची तब्येत ठीक नाही.

राजू श्रीवास्तव लाइफ सपोर्ट सिस्टीम म्हणजेच व्हेंटिलेटरवर आहेत

उल्लेखनीय आहे की राजू श्रीवास्तव यांना एम्समध्ये दाखल करून एक महिना पूर्ण झाला आहे. त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांना गेल्या काही दिवसांत चौथ्यांदा ताप आला. राजूची किडनी, हृदय, यकृत, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी नॉर्मल असल्याचेही वृत्त आहे. व्हेंटिलेटरमध्ये ऑक्सिजनचा आधारही नगण्य राहतो. असे असूनही मेंदू नीट काम करत नाही. अशा परिस्थितीत राजू श्रीवास्तव यांना लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणजेच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT