Latest

केसांना मेंदी का लावतात? जाणून घ्या त्याविषयी

Shambhuraj Pachindre

मेंदी आपल्या सौंदर्य प्रसाधनातील एक महत्त्वाची वनस्पती आहे. प्राचीन काळापासून हाता-पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी मेंदीचा वापर होतो; पण मेंदीचा केवळ सौंदर्य वाढवण्यासाठीच उपयोग होतो असे नाही, तर मेंदीचे औषधी गुणही आहेत आणि केसांसाठी मेंदी अतिशय उपयुक्त असते. केसांचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींसाठी मेंदी उपयुक्त आहे.

निरोगी केस

मेंदीचा पॅक महिन्यातून दोनवेळा केसांना लावावा. त्यामुळे तुमचे केस निरोगी, चमकदार आणि दाट होतील. आपल्या केसांचे नैसर्गिक संतुलन न बिघडवता टाळूवरील आम्ल-अल्कचे संतुलन मेंदीमुळे व्यवस्थित होते. खराब झालेले केस मेंदीमुळे चांगल्या निरोगी स्थितीत येतात. आवळा घातलेल्या पाण्यात मेंदी दोन तास भिजवून ठेवा आणि मग केसांना लावा.

केसांचा कंडीशनर

तुमच्या केसांसाठी मेंदी एक चांगला कंडीशनर आहे. मेंदी तुमच्या सगळ्या केसांमध्ये पसरते आणि एक संरक्षक थर तयार करते, त्यामुळे तुमचे केस खराब होत नाहीत. मेंदी नियमित वापरल्याने तुमचे केस दाट आणि मजबूत होतात. तसेच केसांत ओलसरपणाही राहतो. मेंदीमुळे केसांना नैसर्गिक चमक येते आणि तुमचे केस दुपटीने मजबूत होतात.

पांढरे केस लपवते

कृत्रिम डायमुळे केसांची हानी होते. मेंदी हा त्यावरील एक उत्कृष्ट उपाय आहे. मेंदीत अ‍ॅमिनो अ‍ॅसिड किंवा अन्य कोणतेही रसायन नसते. दोन चमचे सुका आवळा, एक चमचा चहा आणि दोन लवंगा घालून पाणी उकळा. ते गाळून मेंदीत घाला, दोन तास ठेवा आणि मग केसांना लावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT