ambani family  
Latest

Radhika Merchent : कोण आहे राधिका? बहिणही आहे बिझनेसमनची पत्नी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकताच गुजरात मधील जामनगर येथे राधिका-अनंत यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. अनेक उद्योजक, सेलिब्रिटी, टॉप पॉप गायक ते बी-टाऊनचे दिग्गज प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थित होते. (Radhika Merchent ) तीन दिवसीय सोहळ्यात अनेक बडे लोक उपस्थित होते. २८ वर्षीय अनंत अंबानी हे १२ जुलैला एका उद्योगपतीची २९ वर्षीय मुलगी राधिका मर्चेंटशी विवाहबद्ध होईल, असे म्हटले जात आहे. अनंत अंबानी – राधिका मर्चेंट यांनी मागील वर्षी जानेवारीमध्ये साखरपुडा केला होता. तुम्हाला माहितीये का, अंबानी परिवाराची सून राधिका मर्चेंट कोण आहे? (Radhika Merchent )

राधिका-अनंत

राधिका मर्चेंट ही वीरेन मर्चेंट आणि शैला मर्चेंटची धाकटी मुलगी आहे, जी एनकोर हेल्थकेअरचे संस्थापक आणि मालक आहेत. राधिकाचे वडील एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत आणि स्टील निर्माण कंपनी एपीएल अपोलो ट्यूब्सच्या बोर्डाचे सदस्यदेखील आहेत. तर आई शैला एनकोर हेल्थकेअरचे दिगेदर्शक आहेत.

अंजली मर्चेंट-नीता अंबानी-राधिका मर्चेंट

बहिण देखील आहे बिझनेसमनची पत्नी

राधिकाची मोठी बहिण अंजली मर्चेंटचे लग्न बिझनेसमन आकाश मेहताशी झाले आहे, ते एक EY पार्टनर आहेत.

राधिका आईसमवेत

राधिका मर्चेंटने कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल मधून शालेय शिक्षण घेतले आहे. राधिकाने बीडी सोमानी इंटरनॅशनल स्कूलमधून इंटरनॅशनल बॅकलॉरिएट डिप्लोमा देखील केला आहे. राधिका न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्समध्ये पदवीधर आहे.

भारत परतल्यानंतर राधिका मर्चेंट एक लक्झरी रिअल इस्टेट कंपनी इस्प्रावाशी संबंधित काम करत होती. एक वर्षे काम केलयानंतर तिने एनकोर हेल्थकेअरमध्ये काम सुरु केले.

तिने भरतनाट्यम नृत्य शैलीत प्रशिक्षण घेतलं आहे. जून २०२२ मध्ये तिने मुंबईच्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आपले 'अरंगेट्रम' (पहिले स्टेज प्रदर्शन) केलं होतं.

पशु कल्याण, नागरिक अधिकार, आर्थिक सशक्तिकरण, शिक्षण, आरोग्य, मानवाधिकार आणि सामाजिक सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये काम करायला आवडते.

बालपणाचे मित्र आहेत अनंत-राधिका

राधिका आणि अनंत दोघे बालपणीचे मित्र आहेत. असे म्हटले जाते की,, राधिका ही अंबानींच्या घरी नेहमी येत असे. ती २०१८ मध्ये आनंद पीरामल यांच्यासोबत ईशा अंबानी आणि २०१९ मध्ये आकाश-श्लोकाच्या लग्नात देखील सहभागी झाली होती. पण, या माहितीची पुष्टी होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT