nayanthara 
Latest

Nayanthara : शाहरुखने नयनताराला १० वर्षापूर्वी दिलेले वचन असे केले पूर्ण (Old Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क – सातव्या विजय पुरस्कारावेळचा किंग खान शाहरुख आणि दाक्षिणात्य अभिनेत्री शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Nayanthara ) शाहरुखने २०१३ मध्ये नयनताराला दिलेले वचन २०२३ मध्ये पूणर् केले आहे. नयनतारा आता शाहरुखसोबत जवान या चित्रपटात दिसत आहे. (Nayanthara )

पठानच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानचा जवान बॉक्स ऑफिसवर रिलीज झालाय. अॅटलीचा बहुप्रतीक्षित जवान अखेर रिलीज झाला. खास म्हणजे, शाहरुख खानच्या या चित्रपटाची पहिल्या दिवशी जवळपास १ दशलक्ष तिकिटविक्री झालीय. जवानसाठी तब्बल इंडिया वाईड ऑल थिएटरने आतापर्यंत ७ लाख २७ हजार २०० तिकिटे विकली आहेत.

शाहरुखसोबत नयनतारा, विजय सेतुपथी, प्रियामणी मुख्य भूमिकेत आहेत. आता शाहरुख आणि नयनतारा यांचा एक जुना हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नयनतारा, अॅटली, शाहरुख खान दिसत आहेत.

(video-aurangabadsrkcfc insta वरून साभार)

२०१३ चा ७ वा विजय पुरस्कार सोहळ्याचे गोपिनाथ आणि आर माधवन यांनी सूत्रसंचालन केले होते. यावेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानदेखील Chevalier Sivaji Ganesan Award साठी उपस्थित होता.

या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. नयनतारा ही शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. जेव्हा नयनतारा ही गोष्ट सांगते तेव्हा हावभाव करत शाहरुख सुंदर अभिनेत्री नयनताराला बॉलीवूडमध्ये घेऊन जाण्याचा संदर्भात सांगतो. त्यावेळी व्हिडिओमध्ये अॅटली टाळ्या वाजवताना आणि हसताना दिसत आहे. शाहरुखच्या या वचनानंतर नयनतारालादेखील अत्यानंद झालेला दिसतो.

"एसआरकेने दिलेले वचन १० वर्षांनंतर पूर्ण केले. शाहरुखने नयनताराला जवान चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT