दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकाचे व्रत केले जाते. (File photo)
Ganeshotsav

आज आहे हरतालिका उपवास; जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि महत्त्व

Hartalika Teej 2024 | हरतालिकाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व

श्री व्यंकटेश शास्त्री, ज्योतिष पंडित, वास्तुतज्ञ

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकाचे व्रत केले जाते. यंदा ही तारीख दोन दिवसांवर आल्याने हरतालिका तीजचा उपवास (Hartalika Teej 2024) ५ की ६ सप्टेंबरला होणार याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हरतालिकाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी निर्जला व्रत करतात. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची यथायोग्य पूजा करण्याची परंपरा आहे. यासोबतच अविवाहित मुलीही इच्छित वर मिळवण्यासाठी उपवास ठेवतात.

पंचांगानुसार हरतालिका भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:२१ ते ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०१ पर्यंत आहे. अशा परिस्थितीत उदय तिथीवर हरतालिकाचे व्रत शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. (Hartalika Puja)

हरतालिका दिवशी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६:०२ ते ८:३३ पर्यंत पूजा असते. यासोबतच अनेक लोक प्रदोष कालात म्हणजेच संध्याकाळी पूजा करतात. सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होतो. त्यामुळे प्रदोष काल ०६:३६ वाजता सुरू होईल.

Hartalika Teej muhurat : जाणून घ्या मुहूर्त

चर-समान मुहूर्त : सकाळी ०६:०२ ते सकाळी ७:३६, लाभ-उन्नती मुहूर्त: सकाळी ०७:३६ ते सकाळी ०९:१०.

अमृत-सर्वोत्तम मुहूर्त: सकाळी ०९:१० ते सकाळी १०:४५ शुभ वेळ: दुपारी १२:१९ ते ०१:५३ पर्यंत चर संध्याकाळी ०५:०२ ते संध्याकाळी ०६:३६.

रवी योग कालावधी

पंचांगानुसार हरतालिका रवी योग आणि शुक्ल योगासह चित्रा नक्षत्र तयार होत आहे. रवी योग सकाळी ९.२५ पासून सुरू होत असून तो दुसऱ्या दिवशी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६.०२ वाजता समाप्त होईल.

Hartalika Teej 2024 : 'या' काळात पूजा करू नका

हिंदू धर्मानुसार राहुकालात कोणत्याही प्रकारची पूजा करण्यास मनाई आहे. हरतालिका तीज रोजी राहुकाल सकाळी १०:४५ ते दुपारी १२:१९ पर्यंत असेल. या काळात पूजा करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT