shahrukh khan  
Latest

HBD Shah Rukh Khan – शाहरुख माझा हरवलेला मुलगा; एकेकाळी ‘त्या’ महिलेने केला होता दावा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही वर्षांपूर्वी शाहरुख खानविषयी एक मोठी बातमी समोर आली होती. (HBD Shah Rukh Khan ) लातूरच्या राहणाऱ्या एका महिलेने दावा क‍ेला होती की, शाहरुख खान तिचा मुलगा आहे आणि ती त्याची खरी आई आहे. शाहरुखला एका चित्रपटाचे पोस्‍टर पाहून तो आपलाच मुलगा असल्याचे त्या महिलेने म्हटले होते. हे प्रकरण १९९६ रोजीचे होते. त्यावेळी शाहरुख खानने बॉलीवूडला 'द‍िलवाले दुल्हन‍िया ले जाएंगे' यासारखे ब्‍लॉकबस्‍टर चित्रपट दिले होते. (HBD Shah Rukh Khan )

संबंधित बातम्या – 

तिने दावा केला होता की, ६० च्या दशकात तिचा मुलगा हरवला होता. त्या महिलेचे नाव मलनबाई असे होते. त्या मह‍िलेचे म्हणणे होते की, तिने शाहरुख खानला ६० च्या दशकात गमावलं होतं. त्यावेळी ती महिला आपल्या मुलाला घेऊन मुंबईत आली होती. येथे मोलमजुरी करायची. त्यावेळी तिने आपल्या मुलाला गमावलं. शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्यामुळे न‍िराश होऊन ती आपल्या गावी परतली होती. तिने हेदेखील म्हटले होते की, शाहरुख खानचे खरे नाव अलसाब आहे.

शाहरुखला जावं लागलं कोर्टात

महिलेला इतका विश्वास होता की, ती हे प्रकरण घेऊन कोर्टांपर्यंत पोहोचली. शाहरुखलादेखील कोर्टात हजर राहावे लागले होते. पण, शाहरुख खान त्या महिलेचा मुलगा नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर सर्व काही ठिक झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT