Latest

जपानी लोक स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरतात?

Arun Patil

टोकियो : जपानी लोक दीर्घायुष्य जगतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अंदाजे 2 टक्के जपानी लोक असे आहेत ज्यांचे वय हे 100 वर्षांपेक्षा अधिक आहे. जगाच्या पाठीवर अशी आकडेवारी पाहायला मिळत नाही. यामागचे कारण म्हणजे जपानी लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि त्यांची जीवनशैली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लोक काय खातात ज्यामुळे ते सर्वात अधिक वर्षे जगतात तेही अगदी निरोगी आयुष्य? भारतासह जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये आहारतज्ज्ञ असे म्हणतात की, पदार्थांमधील तेलाचे प्रमाण कमी करा नाही तर कोलेस्टेरॉल वाढते आणि बीपी जास्त होते. अशा परिस्थितीत एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जपानी लोक मग स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरतात?

स्वयंपाकासाठी जगभरात अनेक प्रकारची तेलं मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. नारळापासून ते ऑलिव्ह, मोहरीचे तेल, तिळाचे तेल आणि एवोकॅडो ते रेपसीडपर्यंत, अशी अनेक प्रकारचे खाद्यतेल उपलब्ध आहे. मात्र त्यात इतके विरोधाभास आहेत की आपल्याला योग्य तेल कोणते हे ओळखणे कठीण असते. कोणते तेल आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. सर्वात चांगले तेल म्हणून जगभरात बहुतांशी ऑलिव्ह ऑईलची ख्याती आहे. अशा वेळी दीर्घायुष्य जगणारे जपानी लोक कोणते तेल जेवणात वापरतात हे पाहणे कुतुहलाचे ठरते. बहुतेक जपानी कुटुंबे रेपसीड तेल किंवा कॅनोला तेलात अन्न शिजवतात.

रेपसीड तेल हे आरोग्यासाठी वरदान मानले गेले आहे. कारण त्यात फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण बर्‍यापैकी संतुलित असते. याला पांढरे मोहरीचे तेल या नावाने देखील ओळखले जाते. कारण त्याचे पांढरे दाणे मोहरीसारखे दिसतात. यामध्ये फारच कमी प्रमाणात इरुसिक अ‍ॅसिड आढळते, जे रोगांपासून आपले संरक्षण करण्यास सहायक ठरते. त्यातील फॅटी अ‍ॅसिडची रचना अशी आहे की ते शरीराला घातक ठरत नाही. इतर सर्व तेलांच्या तुलनेत ते पौष्टिक आणि हलके तेल असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT