समस्या टॉरेट सिंड्रोमची 
Latest

Tourette syndrome | टॉरेट सिंड्रोम म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे, उपाय

अनुराधा कोरवी

अचानक एखादा शब्द पुन: पुन्हा म्हणणे, पापण्या उघडझाप करणे, हात हलवणे, घसा खाकरणे, सतत वास घेणे, ओठ हलवणे, अचानक काही आवाज काढणे यांसारख्या काही अनियंत्रित हालचाली मुलांमध्ये दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या हालचाली टॉरेंट सिंड्रोमची लक्षणे असतात. ही लक्षणे २ ते १४ या वर्षांच्या वयात दिसून येतात. त्यांचे पूर्वनिदान शक्य नसले तरीही ती नियंत्रित करता येतात. (Tourette syndrome)

एखाद्या स्नायूची सतत अनियंत्रित हालचाल होत असल्यास किंवा तोंड, नाक, घसा यांच्यापैकी एकातून सतत आवाज काढणे ही टॉरेट सिंड्रोमची लक्षणे असतात. राणी मुखर्जी अभिनित एका चित्रपटात याविषयी उल्लेख असल्याचे पाहायला मिळेल. या आजाराविषयी लोकांमध्ये आजही पुरेशी माहिती नाहीये. कारण या आजाराकडे व्यक्तीची विशिष्ट सवय म्हणून पाहिले जाते. २ ते १४ वर्षे वयोगटाच्या मुलांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. आणि ती संपूर्ण आयुष्यभर दिसतात. या समस्येचे उच्चाटन पूर्णपणे करता येत नाही; परंतु त्यावर नियंत्रण जरूर मिळवता येते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाच्या बोलणे, चालणे, उठणे, बसणे या सवयींवर बारकाईने लक्ष द्यायला हवे. यापैकी कोणत्याही कृतीमध्ये असमानता दिसून आल्यास डॉक्टरशी सल्लामसलत करावी.

टॉरेट सिंड्रोम म्हणजे काय?

हा आजार न्यूरोसायकायट्रिक डिसऑर्डर आहे. त्यात मज्जासंस्था योग्य प्रकारे कार्य करत नसल्याने व्यक्ती काही आवाजांवर किंवा हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. अचानक शब्द पुन्हा म्हणणे, पापण्या फडकवणे, हात हलवणे, सतत वास घेणे, ओठ हलवणे, अचानक आवाज करणे यासारख्या अनियंत्रित हालचाली होतात.' नर्व्हस टिक्स किंवा टिक्स म्हणतात.

या हालचालींवर रुग्णाचे बिलकुल नियंत्रण नसते. त्यामुळे इच्छा नसूनही वारंवार त्या हालचाली होत राहातात. अर्थात या सिंड्रोमचा बौद्धिक पातळीवर काहीही परिणाम होत नाही. मात्र टॉरेट सिंड्रोम अनेकदा इतर मानसशास्त्रीय आजार जसे अटेंशन डेफिसिट, हायपर अॅक्टिव्ह डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर इत्यादींच्या बरोबरीने होत असल्याचे आढळून आले आहे. या डिसऑर्डरमुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तींना एका जागी बसून काम करणे किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो.

मुख्य लक्षण- टिक्स

या सिंड्रोमचे मुख्य लक्षण टिक्स असते कारण सर्वात पहिल्यांदा आणि स्पष्टपणे हे लक्षण दिसून येते. टिक्समध्ये दोन प्रकार पडतात. एक व्होकल आणि मोटर मोटर टिक्समध्ये डोके, हात झटकणे, पापण्यांची उघडझाप, चेहरा वेडावाकडा करणे इत्यादी लक्षणे दिसतात. तर व्होकलमध्ये खोकणे, सतत श्वास सोडताना आवाज करणे, घसा खाकरणे इत्यादी. ताणतणाव, अतिउत्साह, आजार आणि थकवा यामुळे ही लक्षणे जास्त वाढतात. यावर पूर्ण बरे होण्यासाठीचे उपचार नाहीत; पण उपचारांनी ते नियंत्रित जरूर होऊ शकते. ही समस्या लवकर लक्षात आल्यास या डिसऑर्डरची स्थिती गंभीर होण्यापूर्वीच नियंत्रित करता येते.

अनेक लोकांना ही समस्या आहे हेच माहीत नसल्यामुळे त्याच्या कारणांची माहितीही नसते. मुळातच हा त्रास असलेल्या लोकांना समाजात मिसळण्याची लाज वाटते. त्यामुळे आजाराची स्थिती आणखी गंभीर होते. त्यामुळे या रोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
तज्ज्ञांच्या मते, मेंदूतील डोपामाईन आणि सेरोटोनिन या रसायनांच्या असंतुलनामुळेदेखील ही समस्या निर्माण होते. अनुवांशिकता आणि पर्यावरणीय कारणे यामुळे ही टॉरेट सिंड्रोम होतो. व्यक्तीच्या जीन्समधून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा डिसऑर्डर जातो. पालकांना हा आजार असल्यास त्यांच्या पुढच्या पिढीतही हा आजार होण्याची शक्यता असते. (Tourette syndrome)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT