मुंबई : उन्हाळ्यात ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा तहान लागणे साहजिक असते. त्याचप्रमाणे हिवाळ्यात किंवा थंडीत तहान न लागणे हे साहजिकच आहे. या दोन्ही गोष्टी नैसर्गिकच आहेत; पण तहान लागत नाही म्हणून पाणी पिणार नाही, असे केल्यास ते केवळ शारीरिकच नव्हे; तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही घातक होऊ शकते.
पुरेशा पाण्यामुळे पचन व्यवस्थित होते. पाणी कमी, तर पचन कमी. त्यातून उद्भवू शकते बद्धकोष्ठता. पाणी कमी घेतल्यास ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणाही येतो. उन्हाळ्यात आपण वारंवार पाणी पितो. त्यामुळे भूक कमी लागते. उलटपक्षी हिवाळ्यात पाणी कमी पितो. त्यामुळे जास्त खाणे होते. यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. एवढेच नाही, तर कमी पाणी पिल्यामुळे सौंदर्यावर परिणाम होत असतो. द्रव पदार्थांच्या कमतरतेमुळे सांधेदुखी उफाळून येऊ शकते. याबरोबरच पाण्याच्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा, डोकेदुखी, तणाव आदी समस्याही उद्भवू शकतात.