पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात वीज पडून तीन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. याबाबत मालदा, जिल्हा दंडाधिकारी नितीन सिंघानिया यांनी सांगितले की, "मालदामध्ये झालेल्या जोरदार वादळामुळे सात जणांचा मृत्यू झाला." कृष्णो चौधरी ( वय ६५), उम्मे कुलसुम (वय ६), देबोश्री मंडल (वय २७), सोमित मंडल (वय १०), नजरुल एसके (वय ३२), रॉबिझोन बीबी (वय ५४) आणि इसा सरकार (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. वाचा सविस्तर बातमी. (West Bengal)
पश्चिम बंगालमध्ये पाऊस गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाल्याने परिसरात वातावरण घबराटीचे बनले आहे. दंडाधिकारी नितीन सिंघानिया यांच्या माहितीनुसार, जुन्या मालदा येथे एकाचा मृत्यू झाला. तर उर्वरित सहा जण कालियाचक परिसरात मरण पावले. या घटनेत एकूण नऊ गुरे ठार झाल्याची माहितीही समोर येत आहे. नितीन सिंघानिया म्हणाले, मालदा येथील बंगीटोला हायस्कूलजवळ शाळेच्या आवारात विजेचा धक्का लागून १२ शालेय विद्यार्थ्यांसह किमान २५ जणांना बंगीटोला ग्रामीण रुग्णालय आणि मालदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
"बाधित कुटुंबांना आवश्यक ती मदत केली जात असल्याची ग्वाही त्यांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि रुग्णालयात दाखल झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. सौमित मंडल (१०) आणि ईशा सरकार (८) हे दोन प्राथमिक विद्यार्थी घरी परतत असताना वीज पडली. दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा