Web Stories

Kids Mental Health : पालकांनो सावधान! मोबाईलमुळे मुलांमध्ये वाढतोय 'ऑटिझम'चा धोका

Parent Alert Rising Concerns Over Mobile Use and Autism Risk in Children

पुढारी वृत्तसेवा

पालकांनो, ही चूक महागात पडेल!

लहान मुलं रडत असतील किंवा जेवत नसतील, तर आपण सहज त्यांच्या हातात मोबाईल देतो. पण ही छोटीशी सवय तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

'एम्स' (AIIMS) चा धक्कादायक खुलासा

एका ताज्या संशोधनानुसार, २ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे 'ऑटिझम' (Autism) सारख्या गंभीर आजाराचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

धोक्याची वयोमर्यादा

ज्या मुलांना जन्मापासून ते १८ महिन्यांपर्यंत मोबाईल पाहण्याची सवय लावली जाते, त्यांच्यामध्ये ऑटिझमची लक्षणे सर्वाधिक दिसून आली आहेत.

मेंदूच्या विकासात अडथळे

मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा प्रकाश आणि वेगवान ग्राफिक्स मुलांच्या नैसर्गिक मेंदूच्या विकासात अडथळे निर्माण करतात.

संवाद साधण्यात अडचणी

जास्त वेळ स्क्रीन पाहणाऱ्या मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये कमी होतात. ही मुले इतरांशी नजर मिळवून बोलणे किंवा संवाद साधणे टाळू लागतात.

मुलांच्या स्वभावात बदल

मोबाईलच्या आहारी गेलेली मुले चिडचिडी होतात आणि आपल्याच विश्वात हरवलेली असतात. त्यांना बाहेरील जगाशी जुळवून घेणं कठीण जातं.

तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

किमान २ वर्षांपर्यंत मुलाला स्क्रीनपासून (टीव्ही, मोबाईल, टॅब) पूर्णपणे दूर ठेवा. त्यांना मोबाईलऐवजी खेळणी आणि गोष्टींच्या पुस्तकात गुंतवा.

वेळ द्या, मोबाईल नको!

मुलांना शांत करण्यासाठी मोबाईल देण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्यासोबत खेळा. तुमचा थोडासा वेळ त्यांना या गंभीर आजारापासून वाचवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT