'लॅपटॉप' (Laptop) ला मराठीत 'मांडी-संगणक' असे म्हटले जाते.
'Laptop' म्हणजे मांडीवर ठेवून सहज वापरता येणारा संगणक.
१९६८ मध्ये 'अॅलन काय' या शास्त्रज्ञाने पोर्टेबल, वैयक्तिक संगणकाची संकल्पना विकसित केली. त्या संकल्पनेला नंतर Dynabook म्हणून विकसित केले गेले
१९८१ मध्ये अॅडम ऑसबॉर्न यांनी जगातील पहिला व्यावसायिक लॅपटॉप बाजारात आणला. याचे वजन तब्बल ११ किलो होते आणि यात अवघी ५ इंचाची स्क्रीन होती.
१९८२ मध्ये 'फ्लिप' डिझाइनचा पहिला लॅपटॉप तयार झाला.
काळाच्या ओघात लॅपटॉप अधिक हलके, वेगवान आणि शक्तिशाली झाले.
शिक्षण, ऑफिसचे काम आणि मनोरंजन यांसाठी लॅपटॉप आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.