Exam Study Tips file photo
१० वी १२ वीच्या परीक्षा असो किंवा स्पर्धा परिक्षा, अभ्यासाला बसलं की विद्यार्थ्यांना झोप खूप येते.
रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा मारत, मोबाईलवर चॅट किंवा गेम खेळत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवसांत मात्र ९-१० वाजताच डुलक्या येतात.
तुम्हालाही असच होत असेल तर काही गोष्टी करा.
१) तुमचं ध्येय नेहमी डोळ्यांसमोर ठेवा,
चांगले मार्क्स मिळाल्यावर काय साध्य होईल, हे आठवा.
२) अभ्यासाची जागा हवेशीर आणि उजेडाची ठेवा
अंधारात किंवा कोंदट खोलीत अभ्यास टाळा
३) बेड किंवा सोफ्यावर बसून अभ्यास करू नका
नेहमी टेबल-खुर्चीवर बसूनच अभ्यास करा
४) रात्री अभ्यास करताना झोपलेल्या लोकांजवळ बसू नका
हॉलमध्ये किंवा गच्चीवर बसून अभ्यास करा
५) परीक्षेच्या काळातही पुरेशी झोप घ्या
झोप पूर्ण असेल तर अभ्यासात लक्ष लागते
६) खूप झोप येत असेल तर कॉफी प्या
स्वतः कॉफी बनववा, यामुळे हालचाल होईल आणि झोप पळून जाईल.