Latest

Russia Ukraine conflict : मानवतेवरील संकट! वॉर्नर ब्रदर्स, डिस्ने, ‘सोनी’ने रशियात चित्रपटांचे प्रदर्शन थांबवले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

Russia Ukraine conflict : युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियावर अमेरिकेसह अनेक देशांनी निर्बंध लादले आहे. आता वॉर्नर ब्रदर्स (Warner Bros), डिस्ने (Disney) आणि सोनी (Sony) आदी चित्रपट निर्मात्या कंपन्यांनी रशियन चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे थांबवले आहे. यामुळे द बॅटमॅन (The Batman), टर्निंग रेड (Turning Red) आणि मॉर्बियस (Morbius) या चित्रपटांचे प्रदर्शन आता निर्धारित वेळेनुसार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगभरातील सरकारे रशियाविरुद्ध निर्बंध वाढवत असताना आता जगभरातील प्रसिद्ध चित्रपट निर्माता कंपन्यांनी रशियात चित्रपट प्रदर्शित करणे थांबवले आहे. वॉर्नर ब्रदर्सचा ब्लॉकबस्टर चित्रपट द बॅटमॅन शुक्रवारी रशियामध्ये रिलीज होणार होता. "युक्रेनमधील युद्धामुळे मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वॉर्नर मीडिया रशियामध्ये 'द बॅटमॅन' या चित्रपटाचे प्रदर्शत थांबवत आहे," असे कंपनीच्या एका प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, डिस्नेने टर्निंग रेड या अॅनिमेटेड चित्रपटाच्या रशियनमधील प्रदर्शनाला विलंब केला आहे. "युक्रेनवर आक्रमण आणि दुःखद मानवतेवरील संकट लक्षात घेऊन आम्ही रशियामधील चित्रपटांचे प्रदर्शत थांबवत आहोत," असे डिस्नेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोनीनेदेखील मॉर्बियस (Morbius) चे प्रदर्शन थांबवले आहे.

Russia Ukraine conflict : युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार

रशियाने रॉकेटसह क्रुझ क्षेपणास्‍त्रांच्‍या केलेल्‍या मार्‍यामुळे युक्रेनमध्‍ये हाहाकार उडाला आहे. (Russia-Ukraine War ) राजधानी कीव्‍ह शहराच्‍या दिशेने रशियन सैन्‍याची आगेकूच करत ६४ किलोमीटर परिसर व्‍यापल्‍याचे सॅटेलाईट फोटोमधून स्‍पष्‍ट झाले आहे. खार्किव्‍ह आणि कीव्‍ह या शहरांच्‍या मध्‍यभागीअसलेल्‍या युक्रेनच्‍या लष्‍करी छावणीवर रशियाने हल्‍ला केला. यामध्‍ये ७० हून अधिक युक्रेनच्‍या सैनिक ठार झाले आहेत. दरम्‍यान, रशिया-युक्रेन युद्‍धासंदर्भात संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार परिषदेच्‍या आपत्तकालीन बैठकीत भारतासह अन्‍य १३ देशांनी भाग घेतला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT