पैठण - पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडूनिया गाठ
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेली शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पालखीचे यंदा चांदीच्या भव्य रथातून दिंडीसह मंगळवारी (दि.७) सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी प्रस्थान झाले. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेत पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांना निरोप दिला.
तब्बल ४२७ वर्षांची परंपरा जपत श्रीसंत एकनाथ महाराजांची पालखी पादुका सोहळा दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना होतो. मंगळवारी सकाळी नाथांच्या वाड्यातील पूजाघरात पादुकांचे विधिवत पूजन पालखी प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा महाराज गोसावी पालखीवाले, ज्ञानेश महाराज, अॅड. योगेश महाराज, रवींद्र महाराज पांडव, श्रीकृष्ण कुलकर्णी, सचिन पांडव यांच्या हस्ते करण्यात आले.
अंभोरे, नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील यांनी मंडप टाकून फुलाची सजावट केली होती. पोलिस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजता पालखी प्रस्थान ओट्यावर पालखी सोहळा दाखल होताच पादुकासह वारकऱ्यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. याप्रसंगी आमदार विलास भूमरे, नाथ मंदिर कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, विनोद लोहारे, दत्ता गोर्डे आदींनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले.
प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा सी.जी, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, सपोनि चंद्रकांत पवार, पोलिस आनिरीक्षक श्रीदरीतिजरा बोबडे लेकर नाराज तहसीलदार राहुल बनसोडे सतीश पेंडसे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी आंभोरे, सहाय्यक मुख्याधिकारी सोमनाथ गर्जे, मंडळ अधिकारी कल्पना शेळके, तलाठी शीतल झिरपे यांनी पालखी प्रस्थानाचे नियोजन व देखरेख केली.
विविध सामाजिक संस्थांकडून भाविकांना मोफत पिण्याचे पाणी, चहा आणि दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघाचे पवन लोहिया, बलराम लोळगे आदी उपस्थित होते यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.