Latest

Vivek Razdan : पदार्पणातील मॅचमध्ये पाच बळी घेऊन सुद्धा ‘या’ खेळाडूला मिळाली नाही पुन्हा संधी

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यामध्ये भारतीय क्रिकेट संघात प्रदार्पण केले होते, हे तर सर्वश्रुत आहे. या दौऱ्यात सचिनने कसोटीमध्ये पदापर्ण केले तसेच एकदिवसीय सामन्यात देखिल त्याने पदार्पण केले. या दौऱ्यातच सचिन सोबत पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वकार युनुस याने सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केले होते. यासह सचिन सोबतच कसोटीमध्ये सलिल अंकोला याने सुद्धा पदार्पण केले होते. तसेच आणखी एका भारताच्या जलदगती गोलंदाजाने भारतीय संघात पदार्पण केले होते. सध्या हा गोलंदाज एक प्रसिद्ध समोलचक बनला आहे. आज त्याचा आवाज सर्व भारतात सुपरिचित आहे. या गोलंदाजा विषयी आपणास फारसे माहिती नाही, पण एक समोलचक म्हणून आपण सर्वजण त्यांना ओळखतो. चला तर मग जाणून घेऊया या प्रसिद्ध समालोचक आणि विस्मृतीत गेलेल्या भारतीय गोलंदाजा बद्दल…(Vivek Razdan)

सचिन तेंडूलकर सोबत त्या पाकिस्तानच्या दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताच्या विवेक राजदान (Vivek Razdan) यांनी पदार्पण केले होते. विवेक राजदान एक मध्यमगती गोलंदाज होते. जम्मू कश्मीर मधून भारतीय संघात येणारे ते पहिले क्रिकेटर होते. सचिन सोबत सलील अंकोला आणि विवेक राजदान यांनी भारतीय संघात पदार्पण केले. पण, त्या दोघांचे करिअर फार काळ चालले नाही. विवेक यांनी भारतासाठी फक्त २ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामनेच खेळू शकले. तर सलिल अंकोला हा १ कसोटी सामना व २० एकदिवसीय सामनेच खेळू शकला. पुढे सलिल अंकोला याने क्रिकेटमध्ये फारसे काही करता न आल्याने बॉलिवूडची वाट धरली व आपले दुसरे करिअर सुरु केले. तर विवेक राजदान यांनी क्रिकेटमध्ये राहून एक क्रिकेट समोलचक म्हणून आपली ओळख निर्माण केली.

आपल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पटकावले पाच बळी (Vivek Razdan)

पाकिस्तान विरुद्धच्या सियालकोट येथील कसोटी सामन्यात विवेक राजदान यांनी ७९ धावा देऊन ५ बळी मिळविण्याची किमया साधली होती. मात्र, ५ बळी मिळवून सुद्धा त्यांना पुन्हा कसोटी सामन्यात संधी मिळू शकली नाही. खरं तर पाकिस्तानच्या दौऱ्यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी विवेक राजदान यांची निवड झाली होती. पण, त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर त्यांना पुन्हा कधीही भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही.

पाकिस्तान दौऱ्यात एकदिवसीय सामन्यात विवेक राजदान आणि सचिन तेंडूलकर यांनी पदार्पण केले. या सामन्यात सचिन जायबंदी झाल्यावर त्याला उचलून पॅव्हेलियनमध्ये घेऊन जाताना विवेक राजदान.

समालोचक म्हणून बनवली स्वतंत्र ओळख (Vivek Razdan)

क्रिकेटमधील करिअर फारकाळ चालले नसले तरी, पुढे विवेक यांनी कोच म्हणून अनेक खेळाडू घडवले. अशा प्रकारे ते क्रिकेटची सेवा बजावत राहिले. नंतर त्यांनी काहीकाळ दिल्ली संघाचे कोच म्हणून जबाबदारी पाहिले. पुढे त्यांना क्रीडा वाहिन्यांवर क्रिकेट सामन्यांचे समालोचन करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी आपले पूर्ण लक्ष समालोचनावर लक्ष केंद्रीत केले. सध्या क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रातील विवेक राजदान हे अग्रमानांकीत नाव समजले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT