विश्वसंचार

ही आहे पक्ष्यांमधील सुंदर ‘परी’!

Arun Patil

सिडनी : जगभरात अनेक सुंदर, चमकदार रंगांचे पक्षी पाहायला मिळतात. त्यामध्येच या ऑस्ट्रेलियातील निळ्याशार पक्ष्याचा समावेश होतो. या पक्ष्याला 'स्प्लेंडेड फेअरी व्रेन' असे म्हटले जाते. 'परी'ची उपमा दिलेला हा पक्षी खरोखरच अतिशय सुंदर दिसतो.

या पक्ष्याच्या आणखी चार उपप्रजाती आहेत. अत्यंत चमकदार निळा व काळा रंग असलेले हे चिमुकले पक्षी चटकन लक्ष वेधून घेतात. पक्ष्यांमध्ये नर हे माद्यांपेक्षा अधिक आकर्षक असतात व या पक्ष्याबाबतही तसेच आहे. नर पक्ष्याचे रंग हे माद्यांपेक्षा अधिक सुंदर असतात. हे पक्षी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या आवाजांचा वापर करतात. आकाराने लहान असल्याने ते अतिशय चपळही असतात.

छोटे किडे खाणारे हे पक्षी समूहाने राहतात. समूहाचे रक्षण करण्यासाठी सगळे एकत्रित प्रयत्नही करीत असतात. संकटाची चाहूल लागताच एकमेकांना सावध करतात. या पक्ष्यांचा वीणीचा हंगाम ऑगस्ट ते जानेवारीपर्यंत असतो. विशेष म्हणजे घरटे बांधण्याचे काम मादीच करते. मादी घरट्यात दोन ते चार अंडी देते. या पक्ष्यांचे आयुष्य पाच-सहा वर्षांचे असते.

SCROLL FOR NEXT