विश्वसंचार

‘हा’ मासा चक्क डोक्यातूनही पाहू शकतो!

Arun Patil

न्यूयॉर्क : महासागरांच्या अथांग दुनियेत अनेक अनोखे जीव राहत असतात. त्यापैकीच एक आहे 'बॅरेलआय फिश'. या माशाचे वैज्ञानिक नाव 'मॅक्रोपिन्ना मायक्रोस्टोमा' असे आहे. या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अनोखे डोळे. तो आपले डोळे कसेही फिरवू शकतो आणि चक्क आपल्या पारदर्शक डोक्यामधूनही वर पाहू शकतो!

हा खोल पाण्यात राहणारा मासा आहे. बेअरिंग सी आणि उत्तर पॅसिफिक महासागरात सुमारे 2000 ते 2600 फूट खोलीवर हा मासा आढळतो. त्याच्या आहारात झूप्लँक्टन आणि कोपीपोडस् हे असतात. त्यांच्या कपाळाचा भाग हा पारदर्शक असतो. या माशांचे डोळे एखाद्या ट्यूबसारखे असतात आणि ती वरच्या दिशेनेही फिरू शकतात. आपल्या पारदर्शक कपाळामधूनही ते वरचे द़ृश्य पाहू शकतात.

त्यांचे डोळे हिरवट दिसत असले तरी त्यांचे भिंग हे पिवळ्या पिग्मेंटस्चे असतात. त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश आणि बायोल्युमिनेसेन्स यामधील फरक समजतो. हा मासा क्वचितच आढळून येतो. 2021 मध्ये कॅलिफोर्नियाच्या तटाजवळील माँटेरे कॅनियमनमध्ये संशोधकांना त्याचे एक फुटेज तयार करण्यात यश आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT