विश्वसंचार

‘हा’ प्राणी नवा मेंदूही बनवतो!

Arun Patil

लंडन : या पालीसारख्या दिसणार्‍या प्राण्याचे नाव आहे 'एक्सोलॉटल'. पाली आपली तुटलेली शेपूट नव्याने निर्माण करू शकतात. मात्र, सॅलॅमँडरच्या प्रजातीचा हा प्राणी आपला मेंदू तसेच हृदय, मणका आणि हाय-पायही नव्याने निर्माण करू शकतो! तो जीवनभर न्यूरॉन्स म्हणजेच चेतापेशी निर्माण करीत असतो. तो हे कसे करतो याबाबत अलीकडेच ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंडच्या संशोधकांनी नवे संशोधन केले आहे.

एक्सोलॉटल आपल्या शरीरातील अनेक अवयवांना 'रिजनरेट' करतो म्हणजेच पुन्हा निर्माण करतो. सर्वप्रथम 1964 मध्ये याबाबतची माहिती समजली होती. त्यावेळी संशोधकांना आढळले की प्रौढ एक्सोलॉटलच्या मेंदूचा निम्मा भाग काढून टाकला तरी तो हा भाग पुन्हा विकसित करण्यात सक्षम आहे. त्याच्या या रिजनरेशन प्रोसेसला समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी त्याच्या मेंदूचा एक नकाशा तयार केला. त्यामधून एक प्रजाती म्हणून या प्राण्याच्या मेंदूच्या उत्क्रांतीलाही समजून घेता आले. संशोधकांना आढळले की त्याच्या मेंदूच्या सर्व भागांमधील पेशी तो पुन्हा विकसित करू शकतो.

हे सर्व घडते त्याच्या विशिष्ट जनुकांमुळे. ते समजून घेण्यासाठी संशोधकांनी या प्राण्याच्या सिंगल सेल आरएनए सिक्‍वेन्सिंगची प्रक्रिया पाहिली, जेणेकरून त्याच्या पेशींना विकसित करण्यास मदत करणार्‍या जनुकांची गणना केली जाईल. अभ्यासातून दिसून आले की त्याचा मेंदू हळूहळू विकसित होतो. संशोधकांनी त्याच्या मेंदूचा सर्वात मोठा भाग 'टेलेनसिफेलॉन'ला काढून टाकले. त्याच्या आत नियोकॉर्टेक्स असते जे कोणत्या जीवाचा व्यवहार आणि त्यांच्या संज्ञानात्मक शक्‍तीला मजबूत करते. बारा आठवड्यांनंतरच एक्सोलॉटलने मेंदूसाठी नव्या पेशी विकसित करणे सुरू केले होते.

पहिल्या टप्प्यात प्रोजेनिटर सेल्स वेगाने वाढल्या. त्या घाव भरण्यासाठी मदत करतात. दुसर्‍या टप्प्यात प्रोजेनिटर सेल्स न्यूरोब्लास्टस्मध्ये अंतर निर्माण करतात. तिसर्‍या टप्प्यात न्यूरोब्लास्टस् वेगवेगळ्या न्यूरॉन्समध्ये म्हणजेच चेतापेशींमध्ये रुपांतरीत होतात. या त्याच न्युरॉन्स आहेत ज्या टेलेनसिफेलॉनमधून काढून टाकल्या होत्या. त्यानंतर न्यूरॉन्स मेंदूच्या जुन्या भागांशी संबंध स्थापित करतात आणि नवा अखंड मेंदू विकसित करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT