विश्वसंचार

हवेतून कार्बन शोषणारा सर्वात मोठा प्रकल्प

Arun Patil

लंडन : संपूर्ण जगावर सध्या हवामान बदलाचे संकट असून त्याचे कारण कार्बन डायऑक्साईडसारख्या 'ग्रीनहाऊस' वायूंचे वाढलेले प्रमाण हे आहे. हवामान बदलामुळे जागतिक तापमानवाढही होत आहे. आता हे कमी करण्यासाठी अनेक कंपन्या वेगवेगळ्या तंत्रांचा शोध लावत आहे. आता हवेतून कार्बन डायऑक्साईड शोधून घेऊन ते जमिनीत सोडणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्प सुरू होत आहे.

या 'ग्रीन टेक्नॉलॉजी'ला विकसित करणार्‍या 'क्लाईमवर्क्स एजी' या स्विस कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. 'डायरेक्ट एअर कॅप्चर' या तंत्राने थेट हवेतूनच कार्बन डायऑक्साईड शोषून त्याचे प्रमाण कमी करण्याची ही पद्धत आहे. ही एक अतिशय प्रभावी पद्धत व जागतिक तापमानवाढीविरुद्ध लढण्यासाठीचे प्रभावी शस्त्र ठरू शकते. भविष्यात या पद्धतीचा वापर अधिक मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

कंपनीने आईसलँडच्या कार्बन स्टोरेज फर्म 'कार्बफिक्स'शी याबाबत हातमिळवणी केली आहे. त्यांच्या प्रकल्पात दरवर्षी 4 हजार टन कार्बन डायऑक्साईड हवेतून शोषून घेतला जाऊ शकतो. इतक्या कार्बनचे उत्सर्जन दरवर्षी 790 वाहनांमुळे होत असते. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या माहितीनुसार गेल्यावर्षी वैश्विक कार्बन उत्सर्जन 31.5 अब्ज टन होते.

या प्रकल्पात आठ कंटेनर असून त्यामध्ये हायटेक फिल्टर आणि फॅन आहेत. ते कार्बन डायऑक्साईड वायूला हवेतून बाजूला काढून त्याला पाण्यात मिसळवते आणि ते जमिनीखाली सोडले जाते. त्यानंतर त्याचे रूपांतर खडकात होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT