विश्वसंचार

‘हवाई चप्पल’ का म्हणतात?

मोहन कारंडे

नवी दिल्ली : काही गोष्टी आपण रोजच पाहत असतो; पण त्या अशाच का किंवा त्यांचे नाव हेच का याची नेमकी माहिती आपल्याला नसते. आरामदायक चप्पल म्हणून आपण हवाई चपलांचा वापर करीत असतो. आपण लहानपणापासून 'हवाई चप्पल' नाव ऐकलं आहे. हवाई चप्पल जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. काळानुरूप हवाई चप्पलमध्ये बदल होत गेले. आजही लोक मोठ्या प्रमाणात हवाई चप्पल वापरतात. या चप्पलची डिझाईन खूप जुनी आहे. स्लिपर हवेत तर उडत नाही मग 'हवाई चप्पल' असे नाव का ठेवलं असेल? तुम्हाला यामागचं कारण माहिती नसेल तर जाणून घ्या.

हवाई चप्पल घातल्यानंतर हवेत उडतो, असा अर्थातच काहीच संदर्भ नाही. चप्पल घातल्यानंतर चालायला खूप आरामदायी आणि हलके वाटते. म्हणूनच याला 'हवाई चप्पल' म्हणत असावे असे काही जणांचे म्हणणे आहे. इतिहासकारांच्या मते, अमेरिकेच्या हवाई बेटांशी याचा संबंध आहे. त्या बेटांवर एक विशेष प्रकारचे झाड आढळते. या झाडापासून निर्माण होणार्‍या रबरापासून हे चप्पल तयार केले जाते. त्यामुळेच या चप्पलला 'हवाई चप्पल' म्हणतात. जपान आणि चप्पलचा संबंध जोडला जात आहे. जपानमध्ये चपलांचा वापर फार पूर्वीपासून होत होता. या चपलांना 'जोरी' असं म्हंटलं जातं. एका दंतकथेनुसार, जापानमधून मजूर अमेरिकेच्या हवाई बेटावर कामासाठी पाठवले होते. हे मजूर जपानी चप्पल घालून हवाईला गेले होते. चपलेची डिझाईन भावली आणि तशीच चप्पल बनवण्यात आली. म्हणून चप्पल आणि हवाई आयलँड असा संदर्भ जोडला जात आहे. दुसर्‍या महायुद्धात अमेरिकन सैनिकांनी हवाई चप्पल वापरली होती. त्यानंतर जगभरात या नावाने प्रसिद्ध झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT