विश्वसंचार

‘हबल’ने टिपले आकाशगंगेचे ‘हृदय’!

Shambhuraj Pachindre

वॉशिंग्टन : 'नासा'च्या हबल टेलिस्कोपने एका आकाशगंगेच्या 'हृदया'चा म्हणजे केंद्राचा शोध लावला आहे. 'हबल'ने 53 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावरील या भव्य आकाशगंगेचा छडा लावला असून तिच्या चमकदार भुजा आहेत. या आकाशगंगेतील अंधार्‍या, धुळीने भरलेल्या क्षेत्रांचाही शोध घेण्यात आला असून तिथे तार्‍यांची निर्मिती होत असल्याचे दिसून आले आहे.

या आकाशगंगेचे नाव आहे 'एनजीसी 3631'. या आकाशगंगेत अधिक धीम्या गतीने चालल्याने अनेक सामग्री थांबते, त्यामुळे धूळ आणि वायू आपापसात मिसळून जातात. जसे जसे पदार्थ अधिक घन होत जातात तसेच गुरुत्वाकर्षणातही बदल घडत जातात. त्यापासून एक नवा तारा निर्माण होतो. हबल टेलिस्कोपच्या प्रतिमेत या तार्‍यांच्या निर्मितीची प्रक्रिया पाहिली जाऊ शकते. निळ्या-सफेद रंगाच्या भागात तार्‍यांची निर्मिती होत असून नारंगी रंग मानवी डोळ्यांना अद़ृश्य असलेला इन्फ्रारेड प्रकाश दाखवतो. हबलच्या वाईड फिल्ड कॅमेरा-3 आणि अ‍ॅडव्हान्स कॅमेरा फॉर सर्व्हेच्या डेटाच्या आधारावर ही प्रतिमा बनवण्यात आली आहे. सर्पिलाकार आकाशगंगा या सामान्यपणे आढळत असतात. मात्र, अशा प्रकारची ग्रँड डिझाईन स्पायरल गॅलेक्झी आढळणे दुर्लभ असते.

SCROLL FOR NEXT