विश्वसंचार

सुपर मार्केटमध्ये आढळले चक्क गोलाकार अंडे!

Shambhuraj Pachindre

मेलबोर्न : अंडे हे 'अंडाकार'च असते हे आपल्याला माहिती आहेच! मात्र निसर्गही कधी कधी आपल्याच नियमांना अपवाद निर्माण करीत असतो. कधी कधी पूर्ण गोलाकार अंडीही निर्माण होतात आणि ती लोकांचे लक्ष वेधून घेतात. आता ऑस्ट्रेलियाच्या एका सुपर मार्केटमधील अशाच गोलाकार अंड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या आकारामुळेच त्याला अव्वाच्या सव्वा किंमत मिळू शकते!

ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्नमध्ये हे सुपरमार्केट आहे. तिथे हे गोलाकार अंडे आढळून आले. अशा अंड्याला 'वन इन ए बिलियन' अंडे म्हटले जाते. अर्थात अब्जावधी अंड्यांपैकी एखादेच असे गोल असते. एकदा अशा अंड्याला 78 हजार रुपयांची किंमत मिळाली होती. आता या अंड्याची किंमतही अशीच असू शकते असा अंदाज आहे. पत्रकार जॅकलिन फेलगेट यांनी सोशल मीडियावरून या अंड्याची माहिती दिली. त्यांनीच या अंड्याचा एक फोटोही शेअर केला. त्यांनी सांगितले की असे गोलाकार अंडे तुमच्याकडे असेल तर ते नीट सांभाळून ठेवा, त्याला चांगली किंमत मिळू शकते! अंड्याच्या कार्टनमध्ये आम्हाला असेच एक गोलाकार अंडे मिळाले.

SCROLL FOR NEXT