विश्वसंचार

सस्तन प्राण्यांचे पूर्वज होते ‘असे’!

Arun Patil

पॅरिस : सस्तन प्राण्यांचे पूर्वज कसे होते हे माहिती आहे का? डायनासोरच्याही आधीच्या काळातील हे प्राणी एखाद्या लठ्ठ सरड्यासारखे होते. त्यांचे डोके अतिशय लहान होते तर त्यांची जीवनशैली सध्याच्या हिप्पोपोटॅमससारखी अर्धी पाण्यातील व अर्धी जमिनीवरील होती. अशा प्राण्यांचे जीवाश्म नुकतेच फ्रान्समध्ये आढळून आले आहे.

हे प्राणी उभयचर वर्गातील होते. सस्तन प्राण्यांच्या आधी अज्ञात असलेल्या कुळ व प्रजातीचे हे प्राणी आहेत. त्यांची लांबी बारा फूट म्हणजेच 4 मीटर इतकी होती. 'पॅलिओ व्हर्टेब्राटा' नावाच्या वैज्ञानिक नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. संशोधकांनी या नव्या प्रजातीला 'लॅलियूडोर्‍हींचस गँडी' असे नाव दिले आहे.

265 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या 'पँगिया' नावाच्या सुपरकाँटिनंट म्हणजेच एका अत्यंत विशाल अशा खंडात हे प्राणी होते. (त्यावेळी सध्याचे वेगवेगळे खंड अस्तित्वात आले नव्हते.) दक्षिण फ्रान्समध्ये सर्वप्रथम 2001 मध्ये अशा प्राण्यांचे जीवाश्म आढळले होते व त्यावेळेपासूनच याबाबत संशोधन सुरू होते. जर्मनीतील फ्रेबर्ग युनिव्हर्सिटीच्या जॉर्ज श्निडर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले.

SCROLL FOR NEXT