विश्वसंचार

सर्वात वेगाने वाढत असलेले कृष्णविवर

Shambhuraj Pachindre

सिडनी : अंतराळातील अनेक रहस्ये, अनोख्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न सुरू असतो. आता ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नऊ अब्ज वर्षांपासून सर्वाधिक वेगाने वाढत असलेल्या कृष्णविवराचा शोध घेतला आहे. हा इतका शक्तिशाली आहे की प्रत्येक सेकंदाला पृथ्वीइतक्या आकाराने वाढत आहे. त्याचे द्रव्यमानही सूर्यापेक्षा तीन अब्ज पटीने अधिक आहे. या कृष्णविवराला पाहिले जाऊ शकते असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

'एआर एक्सआयव्ही' या नियतकालिकात याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की एका खास प्रकारच्या तार्‍यांच्या शोधावेळी हे कृष्णविवर सापडले होते. प्रमुख संशोधक ख्रिस्तोफर ओंकेन यांनी सांगितले की अशा प्रकारच्या ऑब्जेक्टचा शोध वैज्ञानिक 50 वर्षांपासून करीत होते. आता या वेगाने वाढणार्‍या कृष्णविवराचा शोध घेण्यात यश आले. आतापर्यंत वैज्ञानिकांनी अनेक कृष्णविवरांचा शोध घेतला होता; पण हे कृष्णविवर त्यांच्या नजरेतून सुटले होते. काही महिन्यांपूर्वीच संशोधकांनी आपल्या 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेत 'सॅजिटेरिअस ए' नावाच्या कृष्णविवराचा शोध घेतला होता. आता सापडलेले कृष्णविवर त्याच्या तुलनेत 500 पटीने अधिक मोठे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT