विश्वसंचार

सर्वात मोठे वडाचे झाड

Arun Patil

कोलकाता : वटवृक्ष जगभर आढळत असले तरी जगातील सर्वात मोठा वटवृक्ष भारतात आहे. तो इतका मोठा आहे की गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवले गेले आहे. हे झाड 'द ग्रेट बनियन ट्री' या नावाने प्रसिद्ध आहे. हे वडाचे झाड 250 वर्षांहून अधिक जुने आहे. हे झाड इतके मोठे आहे की त्याने स्वतःचे एक जंगलच तयार केले आहे.

हा जगातील सर्वात मोठा वटवृक्ष भारतातील कोलकाता येथील आचार्य जगदीश चंद्र बोस बोटॅनिकल गार्डनमध्ये आहे. या झाडाची स्थापना सन 1787 मध्ये झाली होती. या झाडाची मुळे आणि फांद्या एवढ्या मोठ्या आहेत की संपूर्ण जंगल त्याने वसवले आहे. हे बघून तुम्ही सुरुवातीला अंदाज लावू शकणार नाही की ते एकच झाड आहे.

हे झाड 14,500 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे, जे सुमारे 24 मीटर उंच आहे. या झाडाला तीन हजारांहून अधिक पारंब्या आहेत, ती आता मुळामध्ये रूपांतरीत झाल्या आहेत. त्याच्या विशालतेमुळे या झाडाला जगातील सर्वात रुंद वृक्ष किंवा 'वॉकिंग ट्री' असेही म्हणतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या झाडावर 80 हून अधिक प्रजातींचे पक्षी राहतात. हे झाड जितके मोठे आहे तितकेच ते मजबूत आहे,

यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की 1884 आणि 1925 मध्ये कोलकात्याला आलेल्या चक्रीवादळामुळेही या झाडाला इजा झाली नव्हती. या वादळामुळे झाडांच्या अनेक फांद्या गळून पडल्या, त्यामुळे त्या तोडल्या गेल्या. असे असूनही, जगातील सर्वात मोठे वृक्ष म्हणून त्याची ख्याती कायम आहे. भारत सरकारने 1987 मध्ये या महाकाय बनियनच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले. हे झाड भारतीय वनस्पत सर्वेक्षणाचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. या झाडाची काळजी घेण्यासाठी 13 जणांची टीम तैनात करण्यात आली आहे. त्यात वनस्पतीशास्त्रज्ञ ते माळी यांचा समावेश होतो. त्याचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वेळोवेळी तपासले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT