विश्वसंचार

सर्वात जुनी व्हिस्की 1.75 कोटींची!

Arun Patil

वॉशिंग्टन : जगातील सर्वात जुनी व्हिस्की 'द मॅकलन द रीच'ची आता एका लिलावात विक्री केली जाणार आहे. ही व्हिस्की तब्बल 81 वर्षांपूर्वीची असून तिची अनुमानित किंमत 96.72 लाख रुपयांपासून 1.75 कोटी रुपयांपर्यंत ठरवण्यात आली आहे.

सोथबीज या लिलाव केंद्राकडून या व्हिस्कीचा लिलाव केला जाणार आहे. 'द मॅकलन द रीच'ला 1940 मध्ये डिस्टिल्ड करण्यात आले होते आणि केवळ एक बाटलीच व्हिस्की बनवण्यात आली होती. लिलावात ज्याला ही बाटली मिळेल त्याला एक ब्राँझचे शिल्पही दिले जाणार आहे. तीन हातांचे हे शिल्प असून त्यामध्ये ही व्हिस्कीची बाटली ठेवली जाते. हे शिल्प सास्किया रॉबिन्सन यांनी बनवले आहे. तसेच त्याचे कॅबिनेट 1940 मध्ये द मॅकलन एस्टेटच्या एका एल्म वृक्षाच्या लाकडापासून बनवलेले आहे.

SCROLL FOR NEXT