'भाग मिल्खा भाग'नंतर अनेक खेळाडूंवर बायोपिक बनू लागले. आता भारतीय क्रिकेट संघाची दिग्गज कर्णधार मिताली राज हिच्या 'शाबाश मिथू' या बायोपिकचा ट्रेलर रीलिज करण्यात आला आहे. यामध्ये तिचा संघर्ष आणि यशापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. चित्रपटात मितालीची भूमिका तापसी पन्नू हिने साकारली आहे.
तापसीने या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या खेळात मितालीने कसा प्रवेश केला व कसे यशाचे शिखर गाठले हे या चित्रपटातून पाहायला मिळेल. श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 15 जुलै रोजी प्रदर्शित होईल.