शरीरात नेमके कोठे जायचे हे औषधांना कसे कळते? 
विश्वसंचार

शरीरात नेमके कोठे जायचे हे औषधांना कसे कळते?

backup backup

न्यूयॉर्क : आजारी पडल्यानंतर डॉक्टर आजारावर प्रभावी ठरणारी वेगवेगळ्या प्रकारची औषधे देत असतात. मग हे औषध कधी पातळ, तर कधी गोळ्यांच्या रूपात असते. इंजेक्शनच्या माध्यमातूनही शरीरात औषध पोहोचविले जाते. काहीवेळा शरीराच्या ठराविक भागासाठी औषध दिले जाते. पोटात गेल्यानंतर त्याचा प्रभाव दिसू लागतो. यामध्ये पेनकिलर औषधांचा उल्लेख करावा लागेल. मात्र, शरीरातील नेमक्या भागातच जायचे आहे, असे या औषधांना कसे समजते?

पाठदुखी अथवा डोकेदुखीवर एखादे औषध घेतल्यास ते पाठ अथवा डोक्यातच पोहोचून आपला प्रभाव दाखवते का? याचे उत्तर स्पष्टपणे कोणालाच देता येणार नाही. मात्र, या औषधांमध्ये रसायन घालून असे निश्‍चित केले जाते की, केवळ दुखर्‍या भागावर त्याचा जास्त परिणाम दिसावा आणि अन्य भागावर जास्त प्रभाव दिसू नये. 'कोलोरॅडो युनिव्हर्सिटी'मधील फार्मास्युटिकल्स सायन्सेसचे प्रोफेसर टॉम एंकार्डोक्‍वे यांनी कन्वर्शेशन्समध्ये लेखात म्हटले की, औषधामध्ये काही प्रकारच्या घटकांना खास डिझाईन करून विकसित केले जाते.

जणेकरून शरीराच्या खास भागात पोहोचवून ती औषधे आपला प्रभाव दाखवतील. मात्र, ही औषधे नेमक्या अवयवापर्यंत पोहोचवून ती कसे काम करतात, हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. ज्यावेळी आम्ही औषध घेतो, त्यावेळी ते सर्वप्रथम पोट व आतड्यांत जाऊन विरगळते. त्यानंतर औषधाचे अणू रक्‍तप्रवाहात मिसळल्यानंतर ते विशेष प्रतिक्रिया देणार्‍या कोशिकांच्या बाध्यकारी रिसेप्टर्सला प्रभावित करतात व त्यांच्यावर औषधाचा प्रभाव दिसू लागतो. यादरम्यान, अन्य कोशिकांवर त्याचा कमी प्रभाव होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT