विश्वसंचार

वेलिंग्टन : जगातील मोठ्या बटाट्याची डीएनए टेस्ट

सोनाली जाधव

वेलिंग्टन : जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या व तब्बल 7.8 किलो वजन असलेल्या बटाट्याची लवकरच डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. हा बटाटा न्यूझीलंडमध्ये आढळला आहे. हॅमिल्टननजीक राहणारे कोलिन आणि डोना क्रेग-बाऊन यांच्या बागेत हा बटाटा लागला होता. गेल्या ऑगस्टमध्ये इतका मोठा बटाटा पाहून कोलिन व ब्राऊन आश्‍चर्यचकित झाले होते.

वेलिंग्टन : जगातील मोठ्या बटाट्याची डीएनए टेस्ट
वेलिंग्टन : जगातील मोठ्या बटाट्याची डीएनए टेस्ट

'वॉशिंग्टन पोस्ट'मधील माहितीनुसार कोलिन यांच्या मते, आमच्या बागेत इतका मोठा बटाटा पाहून आम्हाला आश्‍चर्य वाटले. मात्र, या बटाट्याला एक नवी ओळख देण्यासाठी आम्ही गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्शी संपर्क साधला आहे. दरम्यान, यापूर्वीच्या जगातील सर्वात मोठ्या बटाट्याचे वजन 4.9 किलो इतके होते. कोलिन यांच्या बटाट्याने वजनाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र, सर्वात मोठा असा बहुमान देण्यापूर्वी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्ला या बटाट्याची पारख करावयाची आहेत. खरोखरच हा बटाटा आहे की आणखी दुसरे काही आहे, हे पाहण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

सध्या हा बटाटा सुरक्षितपणे फ्रीजमध्ये ठेवण्यात आला आहे; जेणेकरून तो सुकू नये. जर एखाद्यावेळेच तो सुकला आणि त्याचे वजन कमी झाले तर विक्रमाची नोंद करणे अवघड बनणार आहे. दरम्यान, कोलिन यांनी सांगितले की, या वजनदार बटाट्याचे नाव 'डग' असे ठेवण्यात आले आहे. कारण, तो जमीन खोदून काढण्यात आला आहे.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT