विश्वसंचार

वेनिस : दोन हजार वर्षांपूर्वीच्या रस्त्याचा शोध

अमृता चौगुले

वेनिस : पाण्यातच वसलेल्या वेनिस शहराच्या उत्तर भागातील समुद्रात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यात तयार करण्यात आलेला रस्ता सापडला आहे. असेही मानण्यात येत की, त्यावेळी व्हेनिसमधील रस्त्याचा परिसर सुकला होता. मात्र, आज हाच भाग समुद्रात गडप झाला आहे.

या रस्त्याची शास्त्रज्ञानीही पुष्टी केली आहे. याशिवाय या रस्त्याचा नकाशा आणि छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. यामुळे दोन हजार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला हा रस्ता सहजपणे पाहता येऊ शकतो. तसे पाहिल्यास या रस्त्याचा शोध 1980 मध्येच लावण्यात आला होता.

मात्र, याची पुष्टी करण्यासाठी दीर्घकाळ लागला. रोमन साम्राज्यात तयार करण्यात आलेला हा रस्ता वेनिस शहराच्या उत्तर भागात असलेल्या 'ट्रीपोर्टी चॅनेल'मध्ये आहे. व्हेनिस शहर वसण्यापूर्वी काही शतके आधीच हा रस्ता तयार केला गेला होता, असा अंदाज आहे.

वेनिसस्थित 'इन्स्टिट्यूट ऑफ मरीन सायन्स'ची जिओफिजिस्ट फँटिना मॅड्रिकार्डो यांनी सांगितले की, रस्त्याचा हा परिसर काही शतकांपूर्वी सुका होता. त्यावेळी वेेनिस अस्तित्वातही आले नव्हते.

हा रस्ता मुख्य रस्ता असण्याची शक्यता असून त्यास लहान मोठे दुसरे रस्ते जोडले गेले असणार. यासंबंधीची माहिती 'साईंटिफिक रिपोर्टस'मध्ये देण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT