विश्वसंचार

वजन घटवण्यासाठी शिंगाड्याचे पीठ उपयुक्त

Arun Patil

नवी दिल्ली : वजन कमी करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे व्यायाम. मात्र, आजच्या धकाधकीच्या काळात व्यायामाला वेळच उरत नाही. व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्याइतका वेळच नसतो. अशावेळी काही असे पदार्थ आहेत ज्यामुळं तुमचं वजन नियंत्रणात ठेवतील. रोजच आपण जेवणात गव्हाच्या पिठाची पोळी किंवा ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी करीत असतो. मात्र, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात तुम्ही शिंगाड्याचे पीठ वापरू शकता, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

शिंगाडा हा चवीला चांगला असतो. हे फळ पाण्यात पिकवले जाते. त्यामुळं काहीजण 'पाण्याचे फळ' असंही म्हणतात. शिंगाड्यात अनेक प्रकारचे पोषक तत्त्वे असतात. यात वजन नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्मदेखील असतात. त्यामुळे अनेक हेल्थ एक्सपर्ट आहारात शिंगाड्याचे पीठ वापरण्याचा सल्ला देतात. नवरात्रीचे व्रत असताना अनेकजण शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खातात. कारण, यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट आणि प्रोटिन आढळते.

शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुण आढळतात. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. जर तुम्ही झपाट्याने वजन कमी करू इच्छिता, तर शिंगाड्याच्या पिठाचा अनेक पद्धतीने वापर करू शकता. यात चपात्या, ढोकळा, भजी यासारखे अनेक पदार्थ करू शकता. हेल्थ एक्सपर्ट नाश्त्यात शिंगाड्याचे पीठ वापरण्याचा सल्ला देतात. कारण, त्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही आणि तुम्हालाही जास्त जेवण जात नाही. म्हणजेच थेट जेवणाच्या वेळीसच तुम्हाला भूक लागेल.

ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी रोजच्या आहारात शिंगाड्याच्या पिठाचा वापर केला पाहिजे. कारण यात व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि आयोडिनसारखी तत्त्वे आढळली जातात. नाश्तात तुम्ही शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेली चपाती खाल्ली तर दिवसभर तुमचे पोट भरल्यासारखे वाटेल आणि शरीराला ऊर्जादेखील मिळेल. शिंगाड्यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्याचबरोबर यात सोडियम खूप कमी असते. त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT