विश्वसंचार

लिफ्टमध्ये अडकले आणि स्वतःच्याच रिसेप्शनला मुकले!

Arun Patil

न्यूयॉर्क : आयुष्याच्या प्रवासात कधी कोणता प्रसंग येईल हे काही सांगता येत नाही. अमेरिकेत एक भारतीय नवपरिणित दाम्पत्य हॉटेलमध्ये आपल्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी जात होते. मात्र हे दोघे लिफ्टमध्ये तब्बल दोन तास अडकून पडले आणि त्यांना आपल्याच रिसेप्शनच्या कार्यक्रमास मुकावे लागले!

या घटनेचा एक व्हिडीओही आता व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर कॅरोलिनामध्ये घडली. पवन झा आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरिया यांच्या लग्नाची सुरुवातच अशा धक्कादायक घटनेने झाली! नवरदेव व नवरी या सोहळ्यासाठी निघाले आणि हॉटेलच्या लिफ्टमध्ये चढले. त्यानंतर लिफ्ट बंद पडली आणि हे जोडपे तिथेच अडकले. यावेळी दोघांसमवेत त्यांचे काही नातेवाईकही होते. हॉटेलच्या सोळाव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या रिसेप्शन पार्टीला जात असताना हे जोडपे अडकले होते.

हॉटेलच्या रेस्क्यू टीमने त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. अखेर या जोडप्याला आणि पाहुण्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टचा वरचा भाग उघडला आणि वधू-वरांना एक एक करून चौथ्या मजल्यावर खेचले. अशा प्रकारे या जोडप्याची दोन तासांनी सुटका झाली. तोपर्यंत नवरदेव आणि नववधू थकून लिफ्टच्या फ्लोअरवर भिंतीला टेकून बसले होते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT