विश्वसंचार

लाल ग्रहावर ‘नासा’ला सापडले पाण्याचे पुरावे

Arun Patil

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या 'पर्सेव्हरन्स' रोव्हरने मंगळ या ग्रहावरील अत्यंत महत्त्वाचे पुरावे शोधले आहेत. या पुराव्यांच्या माध्यमातून कधीकाळी या लालग्रहावर मोठ्या प्रमाणात पाणी होते, हेच सिद्ध होते.

पर्सेव्हरन्स रोव्हरने 'जेजेरो क्रेटर' या भागातील अशा खडकाळ ठिकाणांचा शोध लावला आहे की, त्यामध्ये जीवनाशी संबंधित संकेत मिळू शकतात. खगोल शास्त्रज्ञांच्या मते, मंगळाची भूमी कधीकाळी पाण्याखाली होती. या पाण्यानेच तेथील खडकाळ भागाचे स्वरूप बदलले होते. म्हणजेच या लालग्रहावर एकेकाळी पाण्याचेच राज्य होते.

दरम्यान, मंगळावरील गोळा करण्यात आलेले नमुने रोबोटच्या मदतीने संरक्षित करण्यात आले आहेत. हे नमुने आता पृथ्वीच्या प्रवासासाठी सज्ज होत आहेत. न्यूजवीकमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

या अहवालातील माहितीनुसार नासाने खासकरून जेजेरो क्रेटरमध्ये पर्सव्हरन्स रोव्हरसाठी लँडिग साईट शोधले होते. खरे तर या भागात सुमारे 45 किमी इतका रुंद आणि खोल खड्डा आहे. हे क्रेटर मंगळाच्या विषुववृत्तीय भागापेक्षा जरा उत्तरेला आहे. तसेच ते समतल आहे. या भागातील प्राचीन सरोवर आणि नदीचा अभ्यास करण्याचा नासाचा प्रयत्न आहे. हे स्थान नासाच्या रोव्हरच्या लँडिंग साईटपासून 2300 मैल अंतरावर आहे. यासंबंधीचे संशोधन 'सायन्सेज अ‍ॅडव्हान्स' नामक विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT