विश्वसंचार

लवकरच पृथ्वीजवळून जाणार महाकाय लघुग्रह

Arun Patil

न्यूयॉर्क : अंतराळात सातत्याने अशा काही घटना घडत असतात की त्या पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहात नाही. मात्र, अशा घटनांबाबत शास्त्रज्ञ चिंता व्यक्त करत नाहीत. कारण त्यांना माहीत असते की, कोणत्या गोष्टीमुळे पृथ्वीवासीयांना धोका निर्माण होऊ शकतो.

डेली स्टार न्यूजने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन अंतराळ संशोधन नासा संस्था सध्या अंतराळातील एका महाकाय खडकाला ट्रॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. असेही म्हटले जात आहे की, हा खडक अथवा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेशही करू शकतो. तो पृथ्वीला धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही या शास्त्रज्ञांना वाटत आहे.

धोकादायक वाटत असणार्‍या या लघुग्रहाचे नाव 199145 (2005 धध128) असे आहे. हा लघुग्रह तब्बल एक किमी रुंद असल्याचे म्हटले जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते हा लघुग्रह पुढील आठवड्यात पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकतो.

खगोल शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार हा लघुग्रह 1870 ते 4265 फूट इतका मोठा असू शकतो. नासाच्या मते, हा लघुग्रह 16 फेब्रुवारीला पृथ्वीजवळ येण्याची शक्यता आहे. यावेळी पृथ्वी आणि लघुग्रह यांच्यात सुमारे 45 लाख किमी इतके अंतर असू शकते.

काही दिवसांपूर्वी असाच एक लघुग्रह पृथ्वीजवळून प्रचंड वेगाने निघून गेला होता. गेल्या 21 जानेवारीला बीयू या लघुग्रहाचा शोध लागला आणि तो 27 जानेवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पृथ्वीजवळून प्रचंड वेगाने निघून गेला होता. यावेळी या दोहोंमधील अंतर 3500 किमी इतकेच होते. मात्र, याचा आकार केवळ 11 ते 28 फूट इतक ाच होते. याचा पृथ्वीला कसलाच धोका नव्हता.

दरम्यान, येत्या 16 फेब्रुवारी रोजी 199145 (2005 धध128) हा लघूग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याने नासाबरोबरच जगभरातील शास्त्रज्ञ त्याच्यावर नजर ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT