विश्वसंचार

रस्त्यावरही स्मार्टफोन पाहणार्‍यांसाठी ‘तिसरा डोळा’!

अमृता चौगुले

सेऊल ः  रस्त्यावरही स्मार्टफोन पाहणार्‍यांसाठी 'तिसरा डोळा'. अनेक लोक सतत स्मार्टफोनलाच आपले डोळे चिकटवून बसलेले असतात. अनेक वेळा रस्त्यावरून चालत असतानाही त्यांची नजर स्मार्टफोनवरच खिळलेली असते. अर्थातच यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. आता अशा लोकांच्या सोयीसाठी दक्षिण कोरियाच्या एका औद्योगिक डिझायनरने चक्‍क 'तिसरा डोळा' विकसित केला आहे. कपाळावर लावल्या जाणार्‍या या उपकरणाने संबंधित माणसाला समोर धोका असल्याची वेळीच जाणीव होऊ शकते.

28 वर्षांच्या पेंग मिन-वूक नावाच्या तरुणाने हा 'आयबॉल' तयार केला आहे. त्याला त्यानेच 'थर्ड आय' असे नाव दिले आहे. स्मार्टफोन वापरणारी व्यक्‍ती हे डिव्हाईस आपल्या कपाळावर लावून रस्त्यातून चालू शकते आणि गोष्टी ब—ाऊज करू शकते.

हे डिव्हाईस कपाळावर लावल्यानंतर ज्यावेळी व्यक्‍ती मोबाईल पाहण्यासाठी डोके खाली करतो त्यावेळी हा तिसरा डोळा 'उघडतो'. रस्त्यात एखादा धोका असल्यास किंवा अडथळा असल्यास हे डिव्हाईस बीप करतो आणि त्या व्यक्‍तीला इशारा देतो. पेंगने सांगितले की, स्मार्टफोनवरून नजर न हटवणारी माणसं आपण आजूबाजूला पाहात असतो. अशा लोकांसाठी आणखी एका अतिरिक्‍त डोळ्याची गरज होती.

रोबोटिक डोळा आणि कोणत्याही अडथळ्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरकर्त्याच्या गळ्यातील तिरकस कोन आणि अल्ट्रासोनिक सेन्सर मोजण्यासाठी गॅयरो सेन्सरचा वापर यामध्ये केला जातो. हा रोबोटिक डोळा त्याच्या समोरील गोष्टीमधील अंतराची गणना करतो. दोन्ही सेन्सर बॅटरी पॅकसह ओपन-सोर्स सिंग-बोर्ड मायक्रोकंट्रोलरला जोडलेले आहेत.

SCROLL FOR NEXT