विश्वसंचार

रशियाचे क्षेपणास्त्र ध्वनीपेक्षाही वेगवान, रशियाची यशस्वी चाचणी

Arun Patil

मॉस्को : रशिया आणि अमेरिकेमधील तणाव कायम असतानाच आता रशियाने अँटी शिप हायपरसोनिक मिसाईल 'जिरकॉन'ची यशस्वी चाचणी घेतली. 'जिरकॉन' एक अँटी शिप मिसाईल म्हणजेच क्षेपणास्त्र आहे. रशियाने नुकतीच त्याची यशस्वी चाचणी घेतली.

पुढील वर्षापर्यंत हे क्षेपणास्त्र सक्रिय केले जाईल असे मानले जाते. विशेष म्हणजे अमेरिकेकडे अद्याप कोणतेही ऑपरेशनल हायपरसोनिक मिसाईल नाही. रशियाचे हे क्षेपणास्त्र ध्वनीपेक्षा सात पट अधिक वेगाने किंवा 'मॅक 7' या वेगाने शत्रूवर हल्ला करू शकते!

चाचणीवेळी या क्षेपणास्त्राने ताशी 8600 किलोमीटर इतकाच वेग घेतला. ते डागल्यानंतर केवळ अडीच मिनिटांत त्याने आपले लक्ष्य भेदले. रशिया आपल्या सैन्याला अशा हायपरसोसिक म्हणजे अतिवेगवान क्षेपणास्त्रांनी संपन्न करण्याची योजना बनवत आहे.

अमेरिकेच्या डिफेन्स सिस्टीमला चकवा देऊन आपल्या लक्ष्याला भेदण्यासाठी रशिया ही पावले उचलत आहे. त्यामुळेच अमेरिकेने या क्षेपणास्त्राच्या चाचणीबाबत तिखट प्रतिक्रियाही दिलेली आहे. रशियाने म्हटले आहे की यावर्षी 200 क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली जाणार आहे.

गेल्यावर्षीही रशियाने सुमारे 200 क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. पुढील आठवड्यात मॉस्कोत होणार्‍या एका एअर शोमध्ये रशियन विमान कंपनी एक लढाऊ विमानही सादर करणार आहे.

SCROLL FOR NEXT