विश्वसंचार

‘रयुगु’ लघुग्रहावर जीवसृष्टीचे संकेत

Shambhuraj Pachindre

टोकियो : अंतराळात एक बर्फाळ आणि ओसाड शिळा इतस्ततः भ—मण करीत आहेत. ही शिळा म्हणजे 'रयुगु' नावाचा एक लघुग्रह आहे. या लघुग्रहावर आता जीवनाचे मूलभूत घटक आढळून आले आहेत. जपानच्या 'हायाबुसा-2' यानाने या लघुग्रहाबाबत अनेक खुलासे केले आहेत.

2019 मध्ये 'हायाबुसा-2'ने रयुगुवरून काही नमुने गोळा केले होते आणि ते पृथ्वीवर परतले होते. वैज्ञानिक त्यावेळेपासूनच या लघुग्रहावरील 5.4 ग्रॅम धुळीचा अभ्यास करीत आहेत. आता जपानच्या शिक्षण मंत्रालयाने या नमुन्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की या धुळीत जीवनाचे घटक अस्तित्वात आहेत. हे नमुने म्हणजे सौरमंडळातील सर्वात प्राचीन सामग्री असल्याचेही जपानी संशोधकांनी म्हटले आहे. एका विशालकाय कार्बनसमृद्ध लघुग्रहाचा रयुगु हा एक तुकडा आहे. मूळ विशाल लघुग्रह धूळ व वायूने बनलेला असावा.

त्याची निर्मिती सौरमंडळाच्या सुरुवातीच्या काळात झालेली असावी. आता रयुगुवरून आणलेल्या धुळीत वीसपेक्षाही अधिक अमिनो अ‍ॅसिडचा छडा लावण्यात आला आहे. अमिनो अ‍ॅसिड हे प्रोटिनचे सुरुवातीचे बिंदू आहेत जे सजीव आपल्या डीएनए कोडच्या आधारावर निर्माण करतात. टीमचे नेतृत्व करणार्‍या हिरोशी नारोका यांनी सांगितले की आम्हाला या नमुन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्री-बायोटिक ऑर्गेनिक कंपाऊंडस् आढळले आहेत. त्यामध्ये प्रोटिनोजेनिक अमिनो अ‍ॅसिड, पॉलिसायक्लिक एरोमॅटिक हायड्रोकार्बन आणि वेगवेगळे नायट्रोजन घटक समाविष्ट आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT