विश्वसंचार

रंगीबेरंगी वायूंमध्ये नव्या तार्‍याचा जन्म

Arun Patil

न्यूयॉर्क : एखाद्या वाळूच्या घड्याळाची कल्पना करा. वरच्या भागातून खालील भागात सरकत असलेले वाळूचे घड्याळ जुन्या काळात वेळ समजण्यासाठी वापरले जात असे. आता अशाच आकाराचा एक नेब्युला 'नासा'च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने कॅमेर्‍यात टिपला आहे. 'नासा'ने आता त्याचे छायाचित्र जारी केले आहे. रंगीबेरंगी वायूंमध्ये एका नव्या तार्‍याचा जन्म झालेला त्यामधून दिसून येते.

अशा नवजात तार्‍याला 'प्रोटोस्टार' असे म्हटले जाते. या छायाचित्रात हा तारा अंतराळात वायूंच्या ढगांमध्ये म्हणजेच नेब्युलात स्वतःला पूर्णपणे विकसित तारा बनवण्यासाठी सामग्री गोळा करीत असलेला दिसतो. हा तारा अतिशय छोटा आणि नवा आहे. आपण सामान्य प्रकाशात सहजपणे नेब्युलामधील रंग पाहू शकत नाही.

मात्र जेम्स वेब टेलिस्कोपच्या माध्यमातून हे शक्य आहे. त्यामध्ये नियर इन्फ्रारेड कॅमेरे लावलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या उष्ण रचना आणि त्यांच्यापासून निघणारे रंग कॅमेर्‍यात टिपता येऊ शकतात. नव्या फोटोतही मध्यभागी एक तबकडी बनलेली दिसते जी सर्वसामान्यपणे पाहता येणे कठीण असते. या प्रोटोस्टारचे नाव 'एल 1527' असे आहे. हा तारा सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा आहे. मध्यभागी जी डिस्क दिसत आहे, ती वास्तवात आपल्या सौरमंडळाच्या आकाराइतकी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT