विश्वसंचार

‘या’ रेडिओ स्टेशनमधून येतो गूढ आवाज

Arun Patil

मॉस्को : जगाच्या पाठीवर काही रहस्यमय ठिकाणे आहेत, त्यामध्ये रशियातील एका रेडिओ स्टेशनचा समावेश होतो. असे म्हटले जाते की या रेडिओ स्टेशनमधून काही गूढ आवाज येतात. अनेक लोक या आवाजांचा संबंध एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांशी जोडत असतात.

हे रेडिओ स्टेशन रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरापासून थोड्या दूर अंतरावर एका निर्जन स्थानी आहे. तेथून ठराविक अंतराने काही प्रक्षेपण होत असते. त्यानंतर कोणत्याही रेडिओ स्टेशनवरून प्रक्षेपण बंद होताच, या स्टेशनवरूनही आवाज ऐकू येऊ लागतो. या रेडिओ स्टेशनचे असे विचित्र प्रक्षेपण गेली अनेक दशके सुरू आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हे रेडिओ स्टेशन जगभर ऐकले जाते, परंतु ते कोण चालवतं याची कोणालाही माहिती नाही.

या रेडिओ स्टेशनचे नाव कोणत्याही रेकॉर्डमध्ये नोंदवलेले नाही. इतकेच नव्हे तर सरकारही याबाबत काहीही जाणून घेण्यास नकार देते. या गूढ स्थानकाचे नावही विचित्रच आहे. 'एमडीझेडएचबी' असे त्याचे नाव. पाश्चिमात्य देशांमध्ये ते 'द बजर' म्हणून ओळखले जाते. गेल्या 35 वर्षांपासून हे रेडिओ स्टेशन जगाला विचित्र आवाज ऐकवत आहे. मात्र, आजपर्यंत कुणीही त्याचा उद्देश डीकोड करू शकलेले नाही.

SCROLL FOR NEXT