विश्वसंचार

मेक्सिकोच्या जंगलात ‘पिरॅमिड सदृश इमारत’

Shambhuraj Pachindre

मेक्सिको : न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोतील घनदाट जंगलात पिरॅमिडसारख्या इमारतीचा शोध लागला असून मेक्सिकोच्या राष्ट्रीय पुरातत्त्व केंद्राचे हे मोठे यश ठरले आहेत. मानववंशशास्त्र व इतिहास विभागाने याचा दाखला देत मेक्सिको शहर एक हजार वर्षांपूर्वी देखील महत्त्वाचे ठिकाण होते, असे म्हटले आहे.

मागील बर्‍याच कालावधीपासून मेक्सिकोच्या घनदाट जंगलात उत्खनन सुरू होते. त्यात या पिरॅमिडसद़ृश इमारतीचा शोध लागला. सदर इमारत आतापर्यंत ज्ञात नसलेल्या प्राचीतन मायन शहराचा एक भाग असेल, असे मानले जाते. मानववंशशास्त्र व इतिहास विभागाने याचे ऑक्यम्टन असे नामकरण केले असून युकाटेक माया भाषेत त्याचा अर्थ स्टोन कॉलम असा होतो.

रॉयटरने दिलेल्या माहितीनुसार, या भागात पिरॅमिडसद़ृश अनेक इमारती, स्टोन कॉलम, तीन प्लाझा व अन्य काँक्रिट सर्कल आढळून आली असून हजार वर्षांपूर्वी हे शहर महत्त्वाचे ठिकाण होते, याचा हा दाखला मानला जात आहे.

या शहरात बॉल कोर्ट, प्री-हिस्पॅनिक बॉल गेम्स, स्टोन हूप होते, असेही या उत्खननात आढळून आले. 10 व्या शतकात माया सोसायटी अस्तित्वात होती. त्यानंतर लोकसंख्येतील बदलामुळे जे व्यापक फेरबदल झाले, त्यात या इमारती वसवल्या गेल्या असतील, असा अंदाज आहे. मेक्सिकोत उत्खननादरम्यान संशोधकांनी 60 किलोमीटर्सचे ट्रेकिंग केले असून जिथे पिरॅमिड सद़ृश इमारती मिळाल्या, तेथील साईट 50 हेक्टर्सपेक्षा जास्त क्षेत्रातील असल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT