विश्वसंचार

मेक्सिको सिटीत आढळले 1500 वर्षांपूर्वीच्या गावाचे अवशेष

Arun Patil

मेक्सिको सिटी : मेक्सिकोची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटीच्या मध्यभागीच पुरातत्त्व संशोधकांना 1500 वर्षांपूर्वीच्या टिओटीहुआकान गावाचे अवशेष सापडले आहेत. त्यामध्ये तीन मानवी देहांचे अवशेष आणि काही वस्तूही सापडल्या आहेत. इसवी सन 450 ते 650 या काळात तिथे मानवी वसाहत होती.

उत्खनन केलेल्या ठिकाणी सिरॅमिकची भांडी आढळून आली आहेत. मेक्सिको सिटीच्या ऐतिहासिक केंद्रस्थानापासून 2.4 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. कारागिर लोकांची या ठिकाणी वस्ती होती असे दिसून आले आहे. मेक्सिकोच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्री अँड अँथ्रोपोलॉजीमधील पुरातत्त्व संशोधक जुआन कार्लोस कॅम्पोस-वॅरेला यांनी सांगितले की हा शोध थक्क करणाराच आहे.

याठिकाणी पूर्वी टेक्सकोको नावाचे सरोवर होते. ते आटल्यानंतर तिथेच कालांतराने मेक्सिको सिटी वसवण्यात आली होती. मात्र, आता दिसून आले की 1300 वर्षांपूर्वीच या ठिकाणी मानवी वसाहत निर्माण झालेली होती. तळ्याच्या पर्यावरणाच्या स्रोतांचा लाभ घेण्यासाठी याठिकाणी लोक राहिले होते. टिओटीहुआकान ही अमेरिका खंडातील सर्वात मोठी प्राचीन नगरी होती असे मानले जाते. तिचे हे ग्रामीण स्वरूप होते असे दिसते.

SCROLL FOR NEXT