विश्वसंचार

मानवी शरीराच्या आश्चर्यकारक गोष्टींची माहिती

Arun Patil

नवी दिल्ली : आपल्या शरीराविषयी आपल्यालाच पुरेशी माहिती नसते. निसर्गाने बनवलेले हे शरीरऐपी यंत्र थक्क करणारेच आहे. शरीराबाबतच्या काही गोष्टी समजताच आपल्याला मोठेच आश्चर्य वाटू शकेल. अशाच काही गोष्टींची ही माहिती…

आपल्या शरीरात रोज एक लिटर लाळ तयार होते. काही वेळा आपला मेंदू जागेपणीपेक्षा झोपेत जास्त सक्रिय असतो. शरीरातील सर्व रक्तवाहिन्या एकत्र जोडल्या तर पृथ्वीला चार वेळा वेटोळे घालता येतील. 'मसल' हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. त्याचा अर्थ 'छोटा उंदीर'. प्राचीन रोमन लोकांना दंडाची बेटकुळी उंदरासारखी वाटत होती व त्यापासून स्नायूसाठी 'मसल' हा शब्द वापरात आला.

आपल्या शरीरातून अतिशय संथपणे प्रकाश उत्सर्जित होतो जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. सामान्य माणसाच्या नाभीमध्ये 67 वेगवेगळ्या प्रजातींचे जीवाणू असतात. आपण दरवर्षी 4 किलो त्वचेच्या पेशी गमावतो. नवजात बाळाच्या डोळ्यातून एक महिन्यानंतर अश्रू बाहेर पडतात. आपल्या नसांमध्ये ताशी 400 किलोमीटर वेगाने रक्त प्रवाहित होते.

SCROLL FOR NEXT