विश्वसंचार

मधुमेहसाठी ‘हे’ जनुकही ठरते जबाबदार

अमृता चौगुले

लंडन : मधुमेह होण्यामागील एक कारण मानवी शरीरातील एका जनुकाशीही निगडित आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, 'जीआयजीवायएफ1' नावाचे हे जनुक 'टाईप-2' मधुमेह होण्याचा धोका सहा पटींनी वाढवते. हे जनुक इन्शुलिनला नियंत्रित करते आणि दर तीन हजारपैकी एका माणसात आढळते.

मधुमेह विकारात रक्तातील शर्करेचे प्रमाण अधिक वाढते. शरीरातील इन्शुलिन या शर्करेचे रूपांतर ऊर्जेत करीत असते. पण इन्शुलिनचे प्रमाण घटल्याने रक्तातील साखर वाढत राहते. बहुतांश लोकांमध्ये मधुमेह अनुवंशिक, लठ्ठपणा आदी कारणांमुळे असतो.

एखाद्या आजाराला एका पिढीतून दुसर्‍या पिढीत नेण्याचे काम जनुकेच करतात. केम्बि—ज युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी आता याबाबतचा अभ्यास करून 'जीआयजीवायएफ1' जनुकला मधुमेहाचे कारण ठरवले आहे. मात्र यावर आणखी संशोधन करण्याची गरज असल्याचेही म्हटले गेले.

संशोधक डॉ. जॉन पेरी यांनी सांगितले की, 'टाईप-2' मधुमेहासारख्या गंभीर आजारांमागे जनुकांची महत्त्वाची भूमिका असते. अशी जनुके स्त्री-पुरुष अशा दोघांमध्येही असतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी शरीरातील वीस हजारपेक्षाही अधिक जनुकांच्या डीएनए सिक्वेन्सला समजून घेता येऊ शकते.

संशोधकांनी बि—टनच्या बायोबँकेतून 80 हजार पुरुषांचा जेनेटिक डेटा घेऊन याबाबतचे अध्ययन केले. त्यामध्ये आढळले की, पुरुषांमधील 'वाय' गुणसूत्राचे 'जीआयजीवायएफ1' या जनुकामुळेच नुकसान होते व कर्करोग तसेच 'टाईप-2' मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT