विश्वसंचार

मंगळ होता पाण्याने समृद्ध

Arun Patil

न्यूयॉर्क : मंगळावर मानवी वस्ती स्थापन करणे शक्य आहे का? याची चाचपणी जगभरातील खगोल शास्त्रज्ञ करत आहेत, पण आजपर्यंत या लालग्रहावर जीवनाचे ठोस पुरावे सापडले नाहीत. दरम्यान अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने यासंबंधी मोठा दावा केला आहे.

'नासा'ने केलेल्या दाव्यानुसार मंगळावर कधी काळी मोठ मोठी सरोवरे अस्तित्वात होती. याचे पुरावे नासाच्या क्युरियोसिटी रोवरने शोधले आहेत. मंगळावरील एका पर्वतीय भागाची रचना पाहून 'नासा'ने अंदाज लावला की, कधी काळी या ग्रहावर मोठ्या प्रमाणात पाण्याचे साठे होते.

'नासा'च्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, मंगळावर कधी काळी असणार्‍या पाण्याचे आणि लाटांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. तर कॅलिफोर्नियातील 'नासा'च्या जेट प्रोपल्सन लॅबोरेटरीमधील क्युरियोसिटी प्रोजेक्ट सायंटिस्ट अश्विन वासवदा यांनी सांगितले की, रोव्हरने अनेकवेळा उंच पर्वतीय भागाचा अभ्यास केला आहे. यादरम्यान या रोवरने असे काही पुरावे शोधले की ते आजपयर्र्त कधीच पाहण्यात आलेले नव्हते.

क्युरियोसिटी रोवर 2014 पासून मंगळावरील सुमारे 3 मैल उंच असलेल्या माऊंट शार्पच्या पायथ्याशी नेविगेट करत आहे. हा पर्वतीय भाग कधीकाळी नदी आणि सरोवराने संपन्न होता. हा पर्वतीय भाग कधी काळी पाण्याखाली बुडाला होता. पण सध्या हा एक वाळवंटासारखा भाग बनला आहे.

रोव्हरने दिलेल्या पुराव्यानुसार मंगळावर अब्जावधी वर्षार्ंपूर्वी प्रचंड प्रमाणात पाणी होते. याशिवाय तेथे मोठ मोठ्या लाटा उसळत होत्या. याचेच पुरावे आजही मंगळावर अनेक ठिकाणी दिसून येतात. सध्या जर सूक्ष्मजीव अस्तित्वात असते तर या भागाने या जीवांना चांगले वातावरण निर्माण करून दिले असते. दरम्यान, नासाचे क्युरियोसिटी रोवर हे गेल्या दहा वर्षांपासून मंगळावर कार्यरत असून ते सध्या माऊंट शार्प भागात सक्रिय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT